आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Google Cci Fine | Supreme Court Refuses To Stay Cci Fine | Deposit Penalty Amount | Google

गुगलला झटका, 10% दंड भरावा लागेल:सुप्रीम कोर्टाचे NCLTच्या आदेशावर शिक्कामोर्तब; गुगल म्हणाले - CCIला सहकार्य करणार

नवी दिल्ली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) ठोठावलेल्या दंडाप्रकरणी गुगलला सर्वोच्च न्यायालयात कोणताही दिलासा मिळाला नाही. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने या प्रकरणी सीसीआयच्या अहवालात कोणतीही त्रुटी नसल्याचे स्पष्ट करत गुगलला ठोठावण्यत आलेला दंड योग्य असल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाने गुगलला दंडाची 10 टक्के रक्कम एका आठवड्यात जमा करण्याचे आदेश दिलेत.

न्यायालयाने गुगलची याचिका पुन्हा राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणाकडे (NCLT) परत पाठवत ट्रिब्युनलला त्यावर 31 मार्चपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश दिलेत. CCIने Google Play-Store वर आपल्या वर्चस्वाचा गैरवापर केल्याबद्दल गुगलला तब्बल 1,337 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.

CCI ने Google ला अयोग्य व्यापार पद्धती थांबवण्याचे आदेश दिले होते. याविरोधात गुगलने प्रथम एनसीएलटी व नंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयात दिलासा न मिळाल्याने गुगलने सांगितले की, 'आम्ही निर्णयाचा आढावा घेत आहोत. Android ने भारतीय वापरकर्ते, डेव्हलपर्स व OEMला खूप लाभ पोहोचवला आहे. विशेषतः भारताच्या डिजिटल परिवर्तनातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कंपनी सीसीआयला सहकार्य करेल.

गुगलला 1338 कोटींचा दंड का?

CCIने Googleच्या बिझनेसचे 2 मार्ग चुकीचे मानले-

1. Google Pay सर्वच अ‍ॅपसाठी डीफॉल्ट पेमेंट सिस्टम बनवण्याचा दबाव

Googleने आपल्या Play Storeवर पब्लिश होणाऱ्या सर्वच अ‍ॅपवर त्यांच्या व्यासपीठावर होणाऱ्या पेमेंटसाठी गुगल पेचा वापर करण्याचा दबाव टाकला होता. हे पेमेंट प्रत्येक In-app Purchase साठी केले जावे असे गुगलचा आग्रह होता. त्यावर अ‍ॅप प्रकाशकांनी आक्षेप घेतला होता.

हा दबाव चुकीचा असल्याचे सीसीआयनेही मान्य केले होते. यामुळे अ‍ॅप प्रकाशक चांगल्या डील मिळवूनही इतर पेमेंट प्लॅटफॉर्मशी टाय-अप करू शकत नव्हते. गुगलचे हे धोरण इतर पेमेंट प्लॅटफॉर्म चुकीच्या पद्धतीने दाबून टाकणारे व बाजारात मक्तेदारी निर्माण करण्याचे साधन मानले गेले.

2. Android वर Google अ‍ॅ​​​​​प्सचे अनिवार्य बंडलिंग

गुगलची अँड्रॉइड मोबाइल ऑपरेटिंग सिस्टीम ही जगातील सर्वाधिक वापरली जाणारी मोबाइल OS आहे. Google ने फोन निर्मात्यांना प्रत्येक नवीन फोनमध्ये Google चे अ‍ॅप्स (Google Search, YouTube, Chrome इ.) डीफॉल्ट म्हणून समाविष्ट करण्यास भाग पाडले होते.

त्यांना केवळ याच अटीवर Android वापरण्याची परवानगी आहे. CCIने हे देखील चुकीचे मानले. यामुळे अँड्रॉइड फोनवर गुगलच्या अ‍ॅप्सची मक्तेदारी निर्माण झाली होती. सॅमसंग सारख्या आपले सर्च इंजिन वापरकर्त्यांना देणाऱ्या कंपन्यांसाठी ही अट त्रासदायक ठरली होती.

बातम्या आणखी आहेत...