आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंना 'पद्मभूषण' पुरस्कार प्रदान:म्हणाले-भारत माझ्या जीवनाचा एक भाग, जिथे जातो तो माझ्यासोबत असतो

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. सुंदर पिचाईंना 2022चा 'व्यापार आणि उद्योग' श्रेणीत उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मान प्राप्त झाल्यानंतर सुंदर पिचाई म्हणाले की, भारत माझ्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. मी जिथे जातो तिथे तो माझ्यासोबत असतो.

मदुराईत जन्मलेल्या पिचाई यांनी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आप्तस्वकियांच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्विकारला. अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांच्याकडून हा पुरस्कार स्विकारला. यावेळी पुरस्कार स्विकारल्यानंतर याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, या सन्मानाबद्दल मी भारत सरकार आणि भारतीय जनतेचा खूप आभारी आहे.

2019 पासून अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई हे 2019 पासून गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटचे सीईओ आहेत. चेन्नई येथे जन्मलेले सुंदर पिचाई 2014 मध्ये गुगलचे प्रमुख झाले. 50 वर्षीय पिचाई यांचा जन्म 10 जून 1972 रोजी मदुराई, तामिळनाडू येथे झाला.

सुंदर पिचाई हे 2019 पासून Google ची मूळ कंपनी Alphabet चे CEO आहेत.
सुंदर पिचाई हे 2019 पासून Google ची मूळ कंपनी Alphabet चे CEO आहेत.

पिचाई चैनईत लहानाचे मोठे झाले सुंदर पिचाई चेन्नई, तामिळनाडू येथे लहानाचे मोठे झाले. त्यांनी आयआयटीमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून मास्टर्स केले आणि त्यानंतर व्हार्टन स्कूलमधून एमबीए केले. 2004 मध्ये त्यांनी गुगलमध्ये नोकरी सुरू केली.

पद्मभूषण भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार
पद्मभूषण हा भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. याआधी भारतरत्न आणि पद्मविभूषण या पुरस्कारांचा समावेश होतो. या पुरस्कार वितरणाची सुरुवात 1954 मध्ये झाली. पंतप्रधानांनी निवडलेल्या पद्म पुरस्कार समितीकडून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. नामनिर्देशन प्रक्रिया सर्वांसाठी खुली आहे. येथे येऊन कोणी स्वतःचे नामांकन करू शकतो. पद्म पुरस्कारांची स्थापना 1954 साली करण्यात आली आणि दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांची घोषणा केली जाते.

पद्म पुरस्कारांची घोषणा जानेवारीत झाली
केंद्र सरकारने यावर्षी जानेवारीत पद्म पुरस्कारांची घोषणा केली. त्यानंतर काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई, पश्चिम बंगालचे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते बुद्धदेव भट्टाचार्य आणि भारत बायोटेकचे संस्थापक कृष्णा एला-सुचित्रा एला व सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (एसआयआय) प्रमुख सायरस पूनावाला यांना जाहीर या पुरस्काराने पद्मभूषणाने सन्मानित केले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...