आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गूगलचे यूजर्सला अवाहन:क्रोम ब्राउजरमध्ये 11 सिक्योरिटी बग्स, यापासून बचावासाठी तात्काळ अपडेट करा; जाणून घ्या याची प्रक्रिया

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर गुगल क्रोम वापरत असाल तर लगेच अपडेट करा. Google ने Chrome ब्राउझरसाठी नवीन अपडेट आणले आहे. तसेच सर्व युजर्सना हे अपडेट तात्काळ इन्स्टॉल करण्याचे आवाहन केले आहे. गुगलच्या म्हणण्यानुसार, हे अपडेट क्रोमच्या 11 सिक्योरिटी इश्यूचे निराकरण करेल. Chrome अपडेट केल्यानंतर, व्हर्जन 98.0.4758.102 (64-बिट) होईल.

Google ला Chrome मध्ये काही बग आढळले आहेत. यापैकी एकाला जीरो-डे रेटिंग देण्यात आले आहे. यामुळे गुगलने युजर्सना तात्काळ अपडेट करण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून यूजर्सना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही. जगभरात 320 कोटी यूजर्स Chrome वापरत आहेत.

जीरो-डे ची असुरक्षितता म्हणजे काय?
जीरो-डे हा कॉम्प्यूटर-सॉफ्टवेअर असुरक्षिततेचा एक प्रकार आहे. ज्याचा फायदा हॅकर्स सहजपणे घेऊ शकतात. हॅकर्सद्वारे कोणतीही असुरक्षा आढळल्यास जीरो-डे रेटिंग दिले जाते. त्याचा सक्रियपणे फायदा घेतला जात आहे. हे टाळण्यासाठी, वापरकर्त्यांनी त्यांचे Chrome आणि सिस्टम सतत अपडेट ठेवणे आवश्यक आहे.

गुगल क्रोम ब्राउझर अपडेट करण्याची प्रक्रिया

  • तुमच्या डिव्हाइसवर Google Chrome ब्राउझर उघडा
  • टॉप राइटमध्ये असलेल्या तीन-डॉटवर टॅप करा
  • हेल्पवर जाऊन About Google Chrome वर जा
  • नवीन विंडोमध्ये, यूजर Chrome ब्राउझरची सध्याचे व्हर्जन पाहू शकतील
  • अपडेट येथे उपलब्ध असेल तर त्यावर क्लिक करून अपडेट करा

क्रोम अॅप देखील अपडेटेड ठेवा
Apple अॅप स्टोअर आणि Google Play Store वरून Chrome ब्राउझर अॅप iOS आणि Android डिव्हाइसवर अपडेट केले जाऊ शकते. Google ने अलीकडेच Chrome ब्राउझरसाठी एक नवीन ट्रॅव्हल फिचरची घोषणा केली आहे. जी तुमच्या ब्राउझिंग हिस्ट्रीला व्यवस्थापित करण्यात मदत करू शकते. नवीन फीचर सब्जेक्ट किंवा कॅटेगिरीच्या आधारावर तुमच्याद्वारे पाहिलेल्या साइटचे ग्रुप बनवते.

बातम्या आणखी आहेत...