आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Google First Foldable Phone Revealed; All Details Explained | Teaser Video | Google Phone

गुगलचा पहिला फोल्डेबल फोन अनव्हिल:यामध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप, किंमत 1.55 लाख रुपये असण्याची शक्यता

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुगलने अधिकृतपणे आपला पहिला फोल्ड करण्यायोग्य फोन Pixel Foldचे अनावरण केले आहे. गुगलने अद्याप नवीन पिक्सेल फोल्डची वैशिष्ट्ये आणि किंमत उघड केलेली नाही. गुगलने ट्विटरवर 'मे द फोल्ड बी विथ यू' या वाक्यासह व्हिडिओ टीझर पोस्ट केला आहे. यासोबतच गुगलने असेही सांगितले की हा डिवाइस 10 मे रोजी Google I/O इव्हेंटमध्ये लॉन्च केला जाईल.

किंमत 1.55 लाख असण्याची शक्यता

नवीन व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की, Google Pixel Fold ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येईल. यातील तिसरा लेन्स पेरिस्कोप लेन्स आहे, जो Samsung Galaxy S23 Ultra मध्ये देखील आढळतो. त्याचवेळी, CNBC च्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, या फोनची किंमत Galaxy Z Fold4 सारखीच असेल. म्हणजेच हा गुगल फोन 1.55 लाख रुपयांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

नवीन फोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येईल. यातील तिसरी लेन्स म्हणजे पेरिस्कोप लेन्स असेल.
नवीन फोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येईल. यातील तिसरी लेन्स म्हणजे पेरिस्कोप लेन्स असेल.

5.8 इंच डिस्प्ले मिळू शकतो
व्हिडिओमध्ये असेही दिसून आले आहे की Google च्या पहिल्या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये व्हर्टिकल हिंज आहे जो टॅब्लेटसारख्या डिस्प्लेप्रमाणे उघडतो. त्याचप्रमाणे, सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड लाइनअपदेखील उघडते. फोन बंद असताना वापरकर्त्यांना वापरण्यासाठी बाह्य टचस्क्रीन मिळते. रिपोर्ट्सनुसार, Google Pixel Fold मध्ये 5.8-इंचाचा डिस्प्ले आढळू शकतो, जो उघडल्यावर 7.6-इंचाच्या टॅबलेटसारखा बनतो.

Pixel च्या फोल्डेबल फोनमध्ये उघडल्यावर 7.6-इंचाचा टॅबलेटसारखा डिस्प्ले आढळू शकतो.
Pixel च्या फोल्डेबल फोनमध्ये उघडल्यावर 7.6-इंचाचा टॅबलेटसारखा डिस्प्ले आढळू शकतो.

एक नवीन पिक्सेल डिवाइस भारतात लाँच होणार
या आठवड्याच्या सुरुवातीला, Google ने देखील घोषणा केली की ते भारतात एक नवीन पिक्सेल डिव्हाइस लाँच करणार आहेत. हा पिक्सेल 7a असू शकतो. कंपनीने याचा एक टीझर शेअर केला आहे. हे उपकरण 11 मे रोजी फ्लिपकार्टवर लॉन्च होईल.