आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगल पे ने युझर्सना दिले 800 ते 81 हजार रुपये:तांत्रिक बिघाडामुळे पैसे झाले ट्रान्सफर, मेल पाठवून सांगितले कारण

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेमेंट प्लॅटफॉर्म Google-Pay ने तांत्रिक बिघाडामुळे 10 ते अमेरिकी डॉलर ते 1000 अमेरिकी डॉलर (सुमारे 818 ते 81 हजार रुपये) काही युझर्सना ट्रान्सफर केले केले, याबद्दल लोकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर आनंदाने माहिती दिली. मात्र, लोकांचा हा आनंद फार काळ टिकला नाही.

कंपनीने त्वरित तांत्रिक त्रुटी शोधून काढल्या आणि नंतर बहुतेक Google Pay युझर्सच्या खात्यांमध्ये जमा केलेली रक्कम परत घेण्यात आली. तथापि, असेही काही व्यक्ती होते ज्यांनी Google Pay ने पैसे परत घेण्याआधी ते वापरून टाकले होते. अशा युजर्ससाठी गुगलने म्हटले आहे की, पैसे तुमचेच आहेत, यासाठी आणखी कोणतीही कारवाई करण्याची गरज नाही.

कुठे झाला तांत्रिक बिघाड?

जेव्हाही Google Pay द्वारे कोणत्याही प्रकारचे पेमेंट केले जाते, तेव्हा पेमेंट प्लॅटफॉर्मवरील सर्व युझर्सना "माय रिवॉर्ड्स" विभागात कूपन मिळतात. हे कूपन स्क्रॅच करताना अनेक वेळा अॅप युझर्सना काही पैसे मिळतात. येथेच अॅपमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता, ज्यामुळे कूपन स्क्रॅच करणाऱ्या लोकांना 10 ते 1000 यूएस डॉलर्स कॅशबॅक म्हणून हस्तांतरित केले गेले.

ट्विटर युजर्सनी स्क्रीनशॉट शेअर करून व्यक्त केला आनंद

मिशाल रहमान नावाच्या ट्विटर युजरने स्क्रीनशॉट शेअर करताना आनंद व्यक्त केला. त्यांनी ट्विटद्वारे म्हटले, “असे दिसते की Google Pay सध्या रँडम युझर्सना पैसे देत आहे. मी नुकतेच Google Pay उघडले आणि माझ्याकडे "रिवॉर्ड्स" मध्ये $46 असल्याचे पाहिले. तथापि, युझरने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये, $ 13.25 (सुमारे 1085 रुपये) कॅशबॅक म्हणून दिसत आहे.

Google Pay ने मेलद्वारे युझर्सना दिली माहिती

तांत्रिक बिघाडामुळे, Google-Pay ने अॅप युझर्सना हस्तांतरित केलेल्या पैशांची मेलद्वारे माहिती दिली. कंपनीने मेल केला की “तुम्हाला हा मेल मिळाला आहे, कारण तुमच्या Google Pay खात्यात चुकून पैसे जमा झाले आहेत. आता ही समस्या सोडवण्यात आली आहे आणि बहुतांश पैसे परत घेण्यात आले आहेत. जेथे आम्ही पैसे परत घेऊ शकलो, तेथे हा व्यवहार तुमच्या खात्यात आधीच दिसून आला आहे. जेथे आम्ही पैसे परत घेऊ शकलो नाहीत, तेथे पैसे तुमचे आहेत. पुढील कारवाईची गरज नाही." या मेलचा स्क्रीनशॉट मिशाल रहमान नावाच्या ट्विटर यूजरने शेअर केला आहे.