आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Google Will Give 75 Thousand Rupees To Its Employees To Buy Essential Items Related To Work From Home, To Open Office From July 6 With 10 Percent Workforce

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुगलचा लॉकडाउन भत्ता:गुगल आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला देणार 75 हजार रुपये! वर्क फ्रॉम होम संदर्भातील आवश्यक विकत घेण्यासठी मदत

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 10 टक्के कर्मचाऱ्यांसह 6 जुलै पासून ऑफिस उघडणार आहे गुगल
  • कार्यालयाचे स्वरुप आधीपेक्षा खूप वेगळा राहील - सुंदर पिचाई

अल्फाबेट कंपनी गूगल (Google) चे सीईओ सुंदर पिचाई यांनी घरातून काम करणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांची खास काळजी घेतली आहे. वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काँप्युटर, लॅपटॉप, फर्निचर किंवा इतर उपकरणे खरेदी करण्यासाठी पिचाई प्रत्येकाला 1000 अमेरिकन डॉलर अर्थात जवळपास 75 हजार रुपये देत आहेत. टेक कंपनीने 6 जुलै पासून किमान 10 टक्के कर्मचाऱ्यांसह ऑफिस पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन ऑफिसचे स्वरूप वेगळे राहील असे पिचाई म्हणाले. सोबतच, घरातून काम करणाऱ्यांना वर्षाखेरीस पर्यंत सुविधा मिळत राहतील.

कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी मंगळवारी एका पोस्टमध्ये सांगितले की कंपनी 10 टक्के कर्मचाऱ्यांसह आपले ऑफिस पुन्हा सुरू करणार आहे. या ऑफिसचे स्वरुप वेगळे राहील. परिस्थिती अनुकूल राहिल्यास गुगल रोटेशन सिस्टिमला पुढे नेणार आहे आणि 30 टक्के पर्यंत कर्मचारी कार्यालयात बोलावले जाऊ शकतील. पिचाई म्हणाले, "आम्हाला जाणीव आहे की मोठ्या संख्येने कर्मचारी वर्क फ्रॉम होमला पसंती देतील. त्यामुळे, प्रत्येकाला 1 हजार अमेरिकन डॉलर देणार आहोत. ही रक्कम सर्वांना 1 हजार डॉलर किंवा त्या देशातील खर्चानुसार दिली जाईल. ही रक्कम आवश्यक उपकरणे आणि फर्निचर घेण्यासाठी खर्च केली जाऊ शकते."

पिचाई यांच्या मते, यावर्षाच्या शेवटपर्यंत किमान कर्मचाऱ्यांसह कार्यालय सुरू केले जाऊ शकेल. तुम्हालाही ऑफिसमध्ये येऊन काम करणे आवश्यक असेल तर तसे 10 जून पर्यंत व्यवस्थापनाला कळवावे. बाकीच्या कर्मचाऱ्यांना वर्षाच्या शेवटपर्यंत घर किंवा ऑफिसमधून काम करणे स्वेच्छेने निवडता येईल.

सोशल डिस्टंसिंगचे पालन करा

पिचाई म्हणाले, जगभरातील कार्यालयांमध्ये दिशानिर्देशांचे पालन केले जात आहे. कर्मचाऱ्यांना कोरोनाचे संक्रमण होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. पुढे देखील ऑफिसचे स्वरुप त्यानुसार बदलले जाईल. आरोग्य आणि सुरक्षेच्या बाबतीत कुठलाही कसूर सहन केला जाणार नाही. गुगलचे मुख्यालय अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे आहे. जगभरात 50 देशांमध्ये गुगलचे इतर 70 ऑफिस आहेत. भारतात बंगळुरू,  गुरुग्राम, हैदराबाद आणि मुंबईत असे तीन गुगल ऑफिस आहेत. एकट्या भारतात या कंपनीमध्ये 53,000 पेक्षा अधिक कर्मचारी काम करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...