आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेडफोन महागणार:नकली दागिन्यांवरील आयात शुल्क वाढवण्याची सरकारची तयारी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकार अशा सर्व वस्तूंची यादी तयार करत आहे, ज्या अनावश्यक गटात मोडतात. देशात मुबलक प्रमाणात तयार होणाऱ्या वस्तू आणि उत्पादनावर आयात शुल्क वाढवण्यावर विचार केला जात आहे. हेडफोन, लाऊडस्पीकर, एलईडी लाइट्स आणि नकली दागिन्यांचाही यात समावेश आहे.

एका अहवालानुसार सरकार स्टी, मिश्र धातू, चिनी मातीसह लुधियानासारख्या सायकल हबसाठी वेगवेगळ्या पार्ट्सची आयात प्रभावित न करता अनावश्यक वस्तूंची आयात मर्यादित करू पाहत आहे. त्यासाठी देशांतर्गत अतिरिक्त उत्पादन क्षमतेमुळे सरकार केवळ स्टीलसाठी आयात शुल्क वाढवण्यावर विचार करत आहे. सरकार अशा इतर वस्तूंवर आयात शुल्क वाढवण्यावरही विचार करत आहे, जेणेकरून व्यापारी तोटा कमी केला जाऊ शकेल. सरकार एलईडी लाइट्सच्या आयातीलाही रेग्युलेट करण्यासाठी केवळ सिंगल वायर एलईडी लाइटच्या आयातीवर उच्च दराने शुल्क लावण्यावर विचार करत आहे.

बातम्या आणखी आहेत...