आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:दमदार पावसाने चांगल्या कृषी उत्पादनाची आशा, नवे उत्पादन बाजारात आणण्याची ही आदर्श वेळ, सरकारने रोबोटिक्स आणि एआयला प्रोत्साहन द्यावे : अशोक हिंदुजा

कुलदीप सिंगाेरिया | भाेपाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना काळात अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी हिंदुजा ग्रुपचे चेअरमन अशोक हिंदुजांशी खास चर्चा
  • गुंतवणूकदारांना सवलत द्यावी, सिंगापूरप्रमाणे मुंबईत ऑफ-शोर-इन्व्हेस्टमेंट सेंटर उघडावे

दमदार पावसामुळे चांगल्या कृषी उत्पादनाची आशा आणि सण-उत्सवांच्या काळात ग्राहक खर्च करतील अशी अपेक्षा आहे. यामुळे नवीन उत्पादने बाजारात आणण्याची ही सर्वात आदर्श वेळ असल्याचे हिंदुजा समूहाचे चेअरमन व भारतीय व्यवसायाची जबाबदारी सांभाळणारे अशोक हिंदुजा यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, सरकारने रोबोटिक्स, एआय, मशीन लर्निंग, ऑगमेंटेड रिअॅलिटी, बिग डेटा अॅनालिटिक्स, सायबरसारख्या डीप टेक लीवरेज्ड व्यवसायांना प्रोत्साहन द्यावे. हे भ‌विष्यातील तंत्रज्ञान आहे, ज्यावर भारताने नियंत्रण मिळवावे. अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठीच्या उपायांवर दैनिक भास्करने त्यांच्याशी केलेल्या चर्चेचा मुख्य भाग...

> जीडीपीतील विक्रमी घट व कोरोना संकटात भविष्यातील संधींकडे कशा प्रकारे बघता?

दमदार पावसाने चांगल्या कृषी उत्पादनामुळे अाशेचा किरण दिसत आहे. ग्रामीण भागातून लहान कार, दुचाकी आणि ट्रॅक्टरची मागणी वाढत आहे. आगामी सण-उत्सवांच्या काळात ग्राहक खर्च करतील, मात्र हे पुरेसे नसेल. पुढील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीतच रिकव्हरी शक्य आहे. लस येण्याची प्रक्रिया आणि ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम कधी पूर्ण होते यावरही बरेच काही अवलंबून आहे.

> औद्योगिक क्षेत्राने कोरोनामुळे निर्माण झालेल्या आव्हानातून काय धडा घेतला?

कार्यशैलीबाबत नवे मापदंड तयार झाले आहेत. वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन मीटिंग्ज आता सामान्य बाबी आहेत. नवे उत्पादन बाजारात आणण्याची ही आदर्श वेळ आहे. आमचे फ्लॅगशिप अशोक लिलँड लवकरच बाजारात मल्टिएक्सल उत्पादन आणणार आहे.

> औद्योगिक क्षेत्रासाठी सर्वात मोठी आव्हाने कोणती?

मागणीतील घट व मंदगतीने होणारी रिकव्हरी उद्योगांसाठीचे सर्वात मोठे आव्हान आहे. भांडवल मिळणे सर्वात महत्त्वाचे आहे. यासाठी बँकांना अधिक कर्ज देण्याचे काम करावे लागेल. सार्वजनिक क्षेत्रांतील बँकांमध्ये मुबलक रोकड आहे. मात्र, बँका उधार देण्याची जोखीम पत्करण्यास तयार नाहीत. याऐवजी निधी साठवून ठेवण्यात त्या प्राधान्य देत आहेत. निर्णय घेण्याच्या भीतीने बँका चुकीच्या ठरतात. या भीतीमुळे उद्योगांसमोरचे निधी संकट बँकांच्या विश्वासाच्या संकटात बदलते.

> गुंतवणूकदारांना कसे आकर्षित करावे?

मुंबईमध्ये सिंगापूरप्रमाणे एक ऑफ-शोर-इन्व्हेस्टमेंट सेंटर सुरू करता येईल, जेथे भारतीय देशांतर्गत कायदे व करप्रणाली लागू नसेल. एमएनसी मुंबईतील ऑफ-शोर इन्व्हेस्टमेंट सेंटरद्वारे गुंतवणूक करू शकतात. देशांतर्गत संस्थांसोबतच विदेशी कायदे फर्म व बँकांना ऑफ-शोर सेंटरमध्ये आमंत्रित करता येईल. तसेच आपण गुंतवणूकदारांना दिले जाणारे व्याज, लाभ व रॉयल्टीवर पुनर्विचार करण्याची गरज आहे. उदाहरणार्थ- कर्जाच्या अनेक प्रकारांवरील सवलतीत ५% सवलत असावी.