आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Government Will Discuss With E Commerce Platforms To Promoting Geographical Indication Products

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आत्मनिर्भर भारत:जीआय टॅगसह होईल भारतीय उत्पादनांची ऑनलाइन विक्री, लवकरच ई-कॉमर्स कंपन्यांसोबत होईल चर्चा

नवी दिल्ली5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'वोकल फॉर लोकल' थीम अंतर्गत सरकार लवकरच बाजारात एक पायलट प्रोजेक्ट लॉन्च करणार आहे. याद्वारे जीआय (GI) टॅगने देशी उत्पादांना वेगळी ओळख देण्याचा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार सरकार याच आठवड्यात ई-कॉमर्स कंपन्यांसोबत चर्चा करणार आहे. मीटिंगमध्ये ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि स्नॅपडीलशी दिशा-निर्देश आणि प्रशिक्षणावर चर्चा होईल.

74 व्या स्वातंत्र्यदिनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतात तयार झालेल्या उत्पादनांना जागतीक स्तरावर नेण्यावर भाष्य केले होते. सरकार देशात आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत लोकल प्रोडक्ट आणि कंपन्यांना जागतिक स्तरावर नेण्यावर काम करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार डीपीआयआयटी (DPIIT) या आठवड्यात ई-कॉमर्स कंपन्यांशी जीआय टॅग बाबत चर्चा करणार आहे.

मीटिंगमध्ये जीआय टॅगअंतर्गत उत्पादनाच्या मुळ भौगोलिक ठिकाणांची माहिती देण्यासोबतच विक्रेत्यांना त्यांची लिस्टिंग, शिपिंग आणि निर्यातीसाठी प्रशिक्षण आणि दिशानिर्देश देण्यावर चर्चा होईल. या टॅगद्वारे ग्राहकांना ती वस्तू कुठे तयार झाली, याचीदेखील माहिती मिळेल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser