आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Government Will Support 300 Startups With Capital And Guidance, Aim To Create 100 Companies Worth More Than One Billion Dollars

इंडियाची यूनिकॉर्न फॅक्ट्री:सरकार प्रारंभिक भांडवल आणि मार्गदर्शनासह 300 स्टार्टअप्सना सपोर्ट करणार, तीन वर्षात एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मूल्याच्या 100 कंपन्या करणार तयार

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 40 लाख रुपयांपर्यंतचे सुरुवाती भांडवल आणि सहा महिन्यापर्यंत मेंटॉरशिप

उत्साही उद्योजकांसाठी आणि नवीन कल्पनांवर काम करणाऱ्या स्टार्टअपसाठी चांगली बातमी आहे. सरकारने आयटी क्षेत्रातील 300 स्टार्टअपना आधार देण्यासाठी एक कार्यक्रम सुरू केला आहे. याला समृद्धी (SAMRIDH) असे नाव देण्यात आले आहे, ज्या अंतर्गत सरकार पुढील तीन वर्षात 100 युनिकॉर्नचे उत्पादन करेल. ज्या स्टार्टअप्सचे बाजार मूल्य एक अब्ज डॉलर्स आहे त्यांना युनिकॉर्न म्हणतात.

40 लाख रुपयांपर्यंतचे सुरुवाती भांडवल आणि सहा महिन्यापर्यंत मेंटॉरशिप
सरकार समृद्धी कार्यक्रमांतर्गत निवडक स्टार्टअपना त्यांच्यासोबत भागीदारी करण्यासाठी आमंत्रित करेल. त्यांना 40 लाख रुपयांपर्यंतचे प्रारंभिक भांडवल आणि सहा महिन्यांसाठी मार्गदर्शन दिले जाईल. हे स्टार्टअप्सना सीड कॅपिटल, म्हणजेच सुरुवाती भांडल, मेंटॉरशिप म्हणजेच मार्गदर्शन प्रदान करण्याबरोबरच बाजारात प्रवेश मिळवण्यात मदत करेल. देशातील स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम 'मैती स्टार्टअप हब' राबवत आहे.

कल्पनेला उत्पादनात बदलण्याच्या प्रक्रियेत मार्गदर्शन महत्वाचे आहे
आयटी आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समृद्धी कार्यक्रमाच्या प्रारंभावेळी सांगितले की त्यांनी पूर्वी 20 हून अधिक स्टार्ट-अप्सचे मार्गदर्शन केले होते. जेव्हा एखादी कल्पना उत्पादनामध्ये बदलण्याच्या प्रक्रियेत असते, तेव्हा त्यांना मार्गदर्श करण्याचे महत्त्व काय असते हे त्यांना चांगले समजते.

इनक्यूबेटर आणि स्टार्टअपचे नेटवर्क 20 टक्क्यांपेक्षा मोठे करायचे आहे
ते म्हणाले की जेव्हा कल्पना उत्पादनामध्ये बदलत आहे आणि उत्पादन विस्तारत आहे, तेव्हा त्यांच्यासाठी हा सर्वात गंभीर काळ आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की अर्ध्याहून अधिक स्टार्टअप्स विविध कारणांमुळे हे टप्पे पूर्ण करू शकत नाहीत. ते म्हणाले की, सरकारला इन्क्यूबेटर आणि स्टार्टअप्सचे जाळे 10, 20 आणि यापेक्षआ जास्त पटींनी मोठे करायचे आहे.

उत्पादन विकासाच्या युगात सपोर्टमुळे स्टार्टअपमध्ये प्रचंड व्हॅल्यू एडिशन होईल
वैष्णव म्हणाले की, बहुतेक स्टार्टअप्ससाठी निधीची कमतरता ही मोठी समस्या नाही. कल्पनेला उत्पादनामध्ये बदलणे किंवा आवश्यक कौशल्य संच मिळवणे ही मोठी आव्हाने आहेत. जर त्या काळात सरकार स्टार्टअप्सना मदत करू शकले तर त्यांच्यात प्रचंड व्हॅल्यू अॅडिशन होईल.

याप्रसंगी बोलताना इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या विशेष सचिव ज्योती अरोरा यांनी सांगितले की, समृद्ध स्टार्टअप एक्सेलरेटर ऑफ मैती फॉर प्रोडक्ट इनोवेशन, डेव्हलपमेंट अँड ग्रोथच्या कॉन्सेप्टला सिलिकन वॅलीचे एक्सेलरेटर वायकॉम्बिनेटर च्या धरतीवर विकसित करण्यात आले आहे. योजनेची घोषणा याच वर्षी करण्यात आली होती. मात्र तेव्हा याला मंजूरी देण्याची प्रक्रिया सुरु होती.

तीन वर्षांपासून इन्क्यूबेटर बिझनेस करत असलेल्या संघटना एक्सेलरेटर म्हणून सामील होऊ शकतील या योजनेत त्या संस्थांना एक्सेलरेटर म्हणून सामील होण्याची संधी मिळेल जे किमान तीन वर्षे इन्क्यूबेटर व्यवसायात असतील. याव्यतिरिक्त, त्याने 50 पेक्षा जास्त स्टार्टअप आणि किमान 10 गैर-सार्वजनिक व्यवसायांना समर्थन दिले असावे. याशिवाय, त्यांचे कामकाज भारतात होणे आवश्यक आहे, त्यांच्याकडे आवश्यक जागा आणि पायाभूत सुविधा देखील असाव्यात.

7 ऑगस्टला मैती स्टार्टअप हबने इंडिया एक्सेलरेटरसोबत केली होती हातमिळवणी
ही पहिलीच वेळ नाही जेव्हा सरकार स्टार्टअप एक्सेलरेटरसोबत पार्टनरशिप करत आहे. 7 ऑगस्ट रोजी मैती स्टार्टअप हब ने SOMA कार्यक्रमांतर्गत इंडिया एक्सेलरेटर सोबत हातमिळवणी केली होती. SOMA कार्यक्रमाचा उद्देश देशात डीप टेक स्टार्टअपला प्रोत्साहन देणे आहे. मैती स्टार्टअप हब हा देशातील स्टार्टअपला प्रोत्साहन देणारा एक प्रोग्राम आहे.

बातम्या आणखी आहेत...