आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Government's Plan On Petrol diesel Price : Government's Close Attention To Geopolitical Situation, Necessary Measures For Rate Control | Marathi News

इंधन दरवाढ होणार का?:निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरही अद्याप इंधन दरवाढ नाही! पेट्रोल-डिझेल दर नियंत्रणावर नेमका काय आहे प्लॅन? सरकारने संसदेत दिली माहिती

नवी दिल्‍ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कच्च्या तेलात दरामध्ये प्रचंड अस्थिरता असताना पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत अर्थ मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी मंगळवारी राज्यसभेत सांगितले की, 'सरकार भू-राजकीय परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. जेव्हा-जेव्हा सामान्य व्यक्तीच्या हिताचे रक्षण करण्याचा प्रश्न येतो तेव्हा सरकार हस्तक्षेप करते.'

युक्रेन संकटामुळे इंधन दरवाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार कस्टम ड्युटी कमी करणार का, असा प्रश्न पंकज चौधरी यांना राज्यसभेत विचारण्यात आला होता. यावर उत्तर देतांना चौधरी म्हणाले की, सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या (OMC) पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर निर्णय घेतात. ही प्रक्रिया आंतरराष्ट्रीय उत्पादन किंमत, विनिमय दर, कर रचना आणि इतर घटकांवर अवलंबून असते. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती २० ते २५ रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.

रशिया-युक्रेन युद्धामुळे क्रूडच्या किमती वाढल्या

24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर, कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल 140 डॉलरच्या जवळपास म्हणजेच 14 वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचल्या होत्या. वास्तविक आता किंमती पुन्हा 100 डॉलरच्या खाली आल्या आहेत. रशियाच्या आक्रमणामुळे अनेक पाश्चिमात्य देशांनी त्यावर कडक निर्बंध लादले आहेत. यामुळेच कच्या तेलाच्या पुरवठ्याबाबत अनिश्चितता दिसून येत आहे. त्यामुळे किंमतींमध्ये मोठी अस्थिरता आहे.

भारतात 85 टक्के कच्चे तेल आयात

भारत आपल्या गरजेच्या 85% कच्च्या तेलाची आयात करतो. त्याची किंमत डॉलरमध्ये मोजावी लागते. अशा परिस्थितीत कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि डॉलरच्या मजबूतीमुळे पेट्रोल आणि डिझेल महाग होते. कच्चे तेल बॅरलमध्ये येते. एक बॅरल, म्हणजे 159 लिटर कच्चे तेल असे गणित असते.

बातम्या आणखी आहेत...