आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उत्पादने विकण्याचे प्रशिक्षण देणार सरकार

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरकार कारागीर, विणकर आणि दागिने उत्पादकांना त्यांची उत्पादने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर नोंदणीकृत करण्यात मदत करण्यासाठी आणि निर्यातीचे फायदे मिळवण्यासाठी प्रशिक्षण प्रदान करेल. यासाठी सरकार या वर्षभरात आउटरीच कार्यक्रम सुरू करणार आहे.

परकीय व्यापार महासंचालक (डीजीएफटी ) संतोष कुमार सारंगी यांनी मंगळवारी ही माहिती दिली. ते म्हणाले, “एक जिल्हा एक उत्पादन योजनेंतर्गत तयार कपडे, रत्ने आणि दागिने आणि ओव्हर-द-काउंटर उत्पादनांच्या निर्यातीसाठी भरपूर वाव आहे. त्यांना ऑनबोर्ड, शोकेस आणि मार्केटिंग कसे करावे याचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यांची उत्पादने थेट निर्यात कशी करता येतील याचे प्रशिक्षणही दिले जाईल.