आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशासकीय नोकरी असो किंवा खासगी कंपनीतील कर्मचारी त्यांना ग्रॅच्युइटीच्या कायद्यातंर्गत ठराविक कालावधीपर्यंत एकाच संस्थेत किंवा कंपनीमध्ये काम केल्यावर ग्रॅच्युईटीचा लाभ मिळतो. जेव्हा एखादा कर्मचारी सलग 5 वर्षं एखाद्या कंपनीसोबत काम करतो, तेव्हा त्याला ग्रॅच्युइटीच्या ठरलेल्या नियमानुसार त्याची रक्कम दिली जाते. एखादा कर्मचारी निवृत्त होत असेल किंवा त्याने नोकरीचा राजीनामा दिला, तरीही त्याला ग्रॅच्युइटी दिली जाते.
यात आपणा सर्वांना एक प्रश्न पडतो की, नोकरी सोडल्यानंतर वा राजीनामा दिल्यानंतर किती दिवसानंतर तुम्ही ग्रॅच्युइटीसाठी दावा करु शकता. जर खूप कालावधी झाल्यानंतर तुम्ही दावा केलात तर तुमची कंपनी ग्रॅच्युइटीचे पैसे देण्यास नकार देईल का, ग्रॅच्युइटीचा दावा करण्याची प्रक्रिया काय आहे. किती दिवसानंतर ग्रॅच्युईटीची रक्कम तुमच्या खात्यात जमा होते. या सर्व प्रश्नांची उत्तरे आज जाणून घेणार आहोत.
सर्वप्रथम जाणून घेऊया ग्रॅच्युइटी म्हणजे काय
ग्रॅच्युइटी मिळण्यासाठी कधीपर्यंत अर्ज करता येतो?
ग्रॅच्युइटी कायदा 1972 नुसार कोणत्याही कंपनीला कर्मचाऱ्याने काम सोडल्यानंतर वा राजीनामा दिल्यानंतर 30 दिवसांच्या आत ग्रॅच्युइटीची रक्कम देणे आवश्यक आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यानेही 30 दिवसांच्या आत ग्रॅच्युइटीसाठी अर्ज करणे गरजेचा आहे. जर कर्मचारी स्वतः अर्ज करू शकत नसेल. तर त्याने नॉमिनी केलेल्या व्यक्तीमार्फत तीस दिवसांच्या आत अर्ज करावा.
मुळात ग्रॅच्युइटी मिळण्यासाठी अर्ज करण्याचा कालावधी हा 30 दिवसांचा निश्चित केलेला आहे. पण कालावधीनंतरही जरी कर्मचाऱ्याने ग्रॅच्युइटीसाठी अर्ज केला असेल तर कंपनी तो अर्ज नाकारू शकत नाही. मात्र, नोकरी सोडल्यानंतर वा राजीनामा दिल्यानंतर किती दिवसांनी तुम्ही अर्ज करू शकता, याबाबत कोणतेही निश्चित असे निकष लावलेले नाहीत. पण अर्ज अंतिम मुदतीनंतर आला असल्याचे कारण देवून कंपनी कधीही तुमचा अर्ज नाकारू शकत नाही.
ग्रॅच्युइटी दावा करण्याची प्रक्रिया
काय सांगतो पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी अॅक्ट
पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी अॅक्ट 1972नुसार, एखाद्या कर्मचाऱ्याने 4 वर्षं, 10 महिने आणि 11 दिवस सलग एकाच कंपनीत काम केले. त्यानंतर नोकरी सोडली. तर त्याला ग्रॅच्युइटी लागू होते. एकंदरीत सांगायचे झाले तर सलग पाच वर्षं एकाच कंपनीत नोकरी केल्यानंतर कोणताही कर्मचारी ग्रॅच्युइटी मिळण्यास पात्र ठरतो. ज्या कंपनीत 10 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी काम करतात, त्या प्रत्येक कंपनीतल्या कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळतो. संबंधित कर्मचाऱ्याने नोकरी बदलली, तो सेवानिवृत्त झाला किंवा काही कारणाने त्याने नोकरी सोडली, तर त्याला ग्रॅच्युइटी मिळू शकते. अर्थात, त्यासाठी त्याला कंपनीत पाच वर्षं पूर्ण केलेली लागतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.