आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Green Signal For 5g Mobile Network Testing, Next Gen Network Telecommunications Department Accepted 13 Application

फाइव्ह जी:मोबाइल नेटवर्कच्या चाचणीस हिरवा कंदील, नेक्स्ट जेन नेटवर्क दूरसंचार विभागाने 13 अर्ज स्वीकारले

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंपन्यांना चाचणीसाठी या आठवड्यात ७०० मेगाहर्ट्‌झ बँडमध्ये स्पेक्ट्रम जारी होणार

देशात फाइव्ह जी मोबाइल नेटवर्कची चाचणी सुरू होत आहे. सरकारने यासाठी १३ अर्ज स्वीकारले आहेत. यासाठी दूरसंचार कंपन्यांना काही अटींसह या आठवड्यात ७०० मेगाहर्ट‌्‌झ स्पेक्ट्रम जारी केले जातील. या प्रकरणातील विशेष बाब म्हणजे, हुवेई आणि झेडटीईसह चीनची कोणतीही कंपनी या चाचणीत भाग घेणार नाही. कारण, सर्व कंपन्यांकडे आपले फाइव्ह जी तंत्रज्ञान नाही. परिणामी त्या नव्या पिढीच्या मोबाइल नेटवर्कच्या चाचणीसाठी एकमेकांशी भागीदारी करत आहेत. उदा. बीएसएनएलने यासाठी सीडॉट आणि भारती एअरटेलसोबत भागीदारी केली आहे. व्होडाफोन आयडिया आणि रिलायन्स जिओने अन्य व्हेंडर्ससोबत भागीदारी केली आहे. त्यात एरिक्सन आणि नोकियाचा समावेश आहे.

अटींसह केवळ चाचणीसाठी मिळेल स्पेक्ट्रम
दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले की, फाइव्ह जी चाचणीसाठी कंपन्यांकडे ज्या अटी ठेवल्या आहेत, त्यात ग्रामीण आणि शहरी भागांत या तंत्रज्ञानाच्या वापर प्रकरणांत चाचणी करणे आणि नेटवर्कच्या सुरक्षेवर विशेष लक्ष देण्याचा समावेश आहे. कंपन्यांना हा इशाराही दिला की, चाचणीसाठी दिलेल्या स्पेक्ट्रमचा व्यावसायिक वापर केला जाऊ नये. अधिकाऱ्यांनुसार, कोणत्याही अटीचे उल्लंघन झाल्यास कंपनीविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. चाचणीनंतर सेवेची व्यावसायिक सुरुवात करण्यासाठी धोरण अाखले जाईल.

फाइव्ह जीने काय बदलेल?

1.कारखान्यांना पुरवठा आणि ग्राहकांसोबत रिअल-टाइम कनेक्टिव्हिटी मिळेल. 2.डेलॉइटनुसार, या तंत्रज्ञानाने भारतात डिजिटल क्रांतीचा वेग वाढेल. 3.स्मार्ट सिटी, व्हर्च्युअल बँकिंग आणि रिमोट मेडिसिनसारख्या संकल्पना वास्तवात येणे सोपे होईल. 4.फोरके आणि ऐटकेसारखे स्ट्रीमिंग सबस्क्रिप्शन आणि बिग डेटा अॅनालिटिक्स वाढेल.

भारत बराच मागे

३४ देशांच्या ३७८ शहरांत फाइव्ह जी नेटवर्क उपलब्ध आहे आणि त्यांची संख्या सलग वाढत आहे.सध्या द. कोरियात सर्वाधिक ८५ शहरांत फाइव्ह जी नेटवर्क आहे. चीनच्या ५७ शहरांत, अमेरिकेच्या ५० शहरांत आणि ब्रिटनच्या ३१ शहरांत फाइव्ह जी नेटवर्क आहे.

प्राधान्यक्रमातील व्हेंडर
रिलायन्स जिओ :
सॅमसंग, नोकिया आणि एरिक्सन

भारतीय एअरटेल : नोकिया, एरिक्सन

व्होडाफोन आयडिया : नोकिया, एरिक्सन आणि मावनीर

बातम्या आणखी आहेत...