आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Gross GST Revenue Stood At 1.67 Lakh Crore In March 2022, 20% Higher Than Last Year, Latest News And Update

GST संकलनाचा नवा उच्चांक:एप्रिलमध्ये सरकारच्या तिजोरीत 1.67 लाख कोटींची भर, गतवर्षीपेक्षा 20% जास्त

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताने GST संकलनाचा एक नवा उच्चांक गाठला आहे. एप्रिल 2022 मध्ये सुमारे 1 लाख 67 हजार 540 कोटींचा जीएसटी गोळा झाला. यात CGST 33,159 कोटी, IGST 81,939 कोटी व सेसच्या 10,649 कोटी रुपयांचा समावेश आहे. तत्पूर्वी, मार्च महिन्यात 1,42,092 कोटींचे जीएसटी संकलन झाले होते.

गतवर्षी एप्रिल महिन्यात 1,39,708 कोटी जीएसटी गोळा झाला होता. म्हणजे, वार्षिक आधारावर जीएसटी संकलनात तब्बल 20 टक्क्यांची वाढ झाली आहे.

प्रथमच दीड लाख कोटींहून अधिकचा जीएसटी

जीएसटी संकलन 1.5 लाख कोटींहून अधिक गोळा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी मार्च महिन्यात 1,42,095 कोटी जीएसटी गोळा झाला होता.

GST संकलनात ही राज्ये आहेत अव्वल

ऑक्टोबरमधील जीएसटी संकलनाच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या पाच राज्यांमध्ये आहे. एप्रिल 2022 मध्ये महाराष्ट्रातील जीएसटी संकलन गतवर्षीच्या तुलनेत 35 टक्के वाढून 27 हजार 495 कोटींवर पोहोचले. हा आकडा गतवर्षीच्या 22 हजार 13 कोटी रुपयांहून कितीतरी मोठा आहे. या यादीत कर्नाटक व गुजरात अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

GST संकलनाच्या बाबतीत टॉप-5 राज्य

राज्यएप्रिल2021एप्रिल 2022वाढ
महाराष्ट्र22,01327,49525%
कर्नाटक9,95511,82019%
गुजरात9,63211,26417%
तामिळनाडू8,849,72410%
उत्तर प्रदेश7,3558,53416%

महागाईचा जीएसटीशी संबंध

महागाई व जीएसटी संकलनाचा संबंध पडताळून पाहिला तर ज्या महिन्यात जीएसटी संकलन वाढले त्याच महिन्यात घाऊक महागाईत (WPI)वाढ झाल्याचे दिसून येते. मार्च 2022 मध्ये जीएसटी संकलनाचा नवा विक्रम झाला होता. तेव्हा WPI दर 14.55 टक्क्यांवर पोहोचला होता. एखाद्या वस्तुची किंमत वाढल्यानंतर त्यावरील करही वाढतो. त्यामुळे असे होते. समजा, एका पोत्याची किंमत मार्च महिन्यात 300 रुपये होती. तर त्यावर 28 टक्के जीएसटीच्या हिशोबाने 84 रुपये कर लागतो. तर एप्रिल महिन्यात त्याच पोत्याची किंमत 320 रुपये झाली तर त्यावर 90 रुपये कर लागेल. यावरुन महागाईत वाढ झाली तर आपसूकच जीएसटी संकलनात वाढ होते हे स्पष्ट होते. तथापि, मागणीत घट झाली तर जीएसटी संग्रहातही आपसूकच घटक होते.

तुम्हीही भरता जीएसटी

तुम्ही कोणत्याही प्रकारचा व्यवहार केला तरी तुम्हाला त्यावर जीएसटी द्यावा लागतो. त्याचप्रकारे तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल तर तुम्हाला तुमच्या ग्राहकांना बिलात जीएसटी जोडून द्यावा लागतो. त्यानुसार, ग्राहक तुम्हाला पैसे देतो. त्यानंतर त्या बिलातील जीएसटीचा भाग तुम्हाला पुढील महिन्याच्या 20 तारखेपर्यंत सरकारी तिजोरीत जमा करावा लागतो. देशात जीएसटीची वेगवेगळी कररचना आहे.

GST चे 4 स्लॅब

देशात GST चे 5, 12, 18 व 28% चे 4 स्लॅब आहेत. पण, गोल्ड और गोल्ड ज्वेलरीवर 3% टॅक्स लागतो. काही अनब्रँडेड व अनपॅक्ड उत्पादनांवरही जीएसटी लागत नाही.

बातम्या आणखी आहेत...