आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राउंड रिपोर्ट:आशियातील सर्वात मोठे मार्बल आणि ग्रॅनाइट हब किशनगडमधून

किशनगडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिअल इस्टेटमध्ये तेजीचा परिणाम, दीडपटीपेक्षा जास्त वाढली ग्रॅनाइट आणि मार्बलची मागणी

कोरोनानंतर आर्थिक हालचाली वाढणे आणि सरकारी प्रोत्साहनातून स्थावर मालमत्तेत परतलेल्या तेजीने ग्रॅनाइट आणि संगमरवराची चकमकही वाढली आहे. कोरोनाआधीच्या तुलनेत ग्रॅनाइट आणि मार्बलचा व्यवसाय दीडपटीने वाढला आहे. यामुळे आशियातील सर्वात मोठ्या ग्रॅनाइट आणि मार्बल हब किशनगडमध्ये(राजस्थान) पुन्हा उत्साह संचारला आहे. जवळपास दोन लाख लोकसंख्येच्या या शहरात ५३ हजारांहून जास्त लोक राेजगारासाठी ग्रॅनाइट आणि मार्बलच्या व्यवसायावर अवलंबून आहेत.

किशनगड मार्बल असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर जैन म्हणाले, कोरोना काळात बाजारात व्यापाऱ्यांची स्थिती बिकट झाली होती. मात्र, कोरोनानंतर आलेल्या उठावामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. किशनगड मार्बल बाजार कोरोनातून पूर्णपणे सावरला आहे. येथून देशातच नव्हे तर जगातील अनेक देशांत ग्रॅनाइट निर्यात केले जाते. आता ग्रॅनाइट आणि मार्बलचा व्यापार रोज २४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कोरोनाआधी हा १५ कोटी रु. प्रतिदिन होता. जैन म्हणाले, सध्या मार्बलच्या १०० आणि ग्रॅनाइटच्या ३०० गाड्या रोज भरल्या जात आहेत. येथून व्हिएतनाम, श्रीलंका, तुर्कस्तान, अरब देश, इंडोनेशियासह एक डझनहून जास्त देशांना ग्रॅनाइट निर्यात केले जात आहे. रिअल इस्टेट तज्ज्ञांनुसार, सध्या निवासी घरांमध्ये बहुतांश व्हेट्रिफाइड टाइल्सचा वापर होतो. ग्रॅनाइट आणि मार्बलचा बहुतांश उपयोग व्यावसायिक मालमत्ता उदा. हॉटेल, रिसॉर्ट, कार्यालय आदीत केला जात आहे.

मालमत्ता कन्सल्टंट फर्म नाइट फ्रँक आणि उद्योग संघटना फिक्की व नारेडकोने नुकत्याच जारी केलेल्या रिअल इस्टेट सेंटिमेंट रिपोर्टनुसार, २०२० च्या अखेरीस लस तयार झाल्याच्या वृत्तानंतर ऑफिस स्पेसमध्ये व्यवहार वाढले आहेत. जागतिक कंपन्यांची स्थिती सामान्य झाल्यानंतर भविष्याची आवश्यकता लक्षात घेऊन खरेदी करत आहेत. यामुळे ऑफिस स्पेसची मागणी जास्त आहे आणि जास्त ग्रॅनाइटही द.भारतीय राज्यांना जात आहे. देशातील सर्वात मोठी मार्बल कंपनी आर.के. मार्बल ग्रुपचे वरिष्ठ अधिकारी सुभाष अग्रवाल म्हणाले, ग्रॅनाइटचा देशात पुरवठा हाेत आहे.

ग्रॅनाइटसमोर फिके पडतेय मार्बल

२०१४ पर्यंत किशनगडमध्ये प्रतिदिन ४५० ट्रकमधून मार्बल वाहतूक होत होती. २०१४ नंतर ग्रॅनाइटने मार्बलची जागा घेण्यास सुरुवात केली. मार्बलच्या तुलनेत जास्त चमक आणि स्वस्त पडत असल्याने ग्रॅनाइटच्या मागणीत सतत वाढ होत आहे. याशिवाय रेडी-टू-युज असल्यामुळेही ग्रॅनाइट जास्त पसंत केले जाते. मार्बलच्या तुलनेत ग्रॅनाइट जास्त बळकटही आहे. यामुळे ग्रॅनाइटची मागणी मार्बलपेक्षा वाढली आहे. सध्या, किशनगडमध्ये होणाऱ्या एकूण व्यवसायात ग्रॅनाइटची हिस्सेदारी ७० टक्के आहे. ३० टक्के हिस्सेदारी मार्बलची आहे.

ग्रॅनाइटचा व्यवसाय प्रतिदिन १८ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.रोज सहा कोटी रुपयांचे संगमरवर विकले जाते. लोकांचा कल ग्रॅनाइटकडे जास्त होत आहे. याचे कारण म्हणजे रेडी-टू- फिट आहे. मार्बलमध्ये प्रक्रिया थोडी लांब आहे.

सिमेंट, स्टील, गृहकर्ज आणि रोजगार वृद्धीही दिसू शकेल

सुजन हाजरा | मुख्य अर्थतज्ज्ञ, आनंद राठी फायनान्शियल सर्व्हिसेस

देशाचे स्थावर मालमत्ता क्षेत्र कोविड-१९ मुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये मागे गेल्यानंतर आता वेगाने सुधारणा करत आहे. २०१६-१७ दरम्यान सरकारचे काही धोरणात्मक निर्णय आणि सुधारणांमुळेही रिअल इस्टेट क्षेत्र मागे होते. मात्र, मागे काही राज्य सरकारांनी मुद्रांक शुल्कात सवलतीसारखे उपाय, केंद्र सरकारचे या क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या योजनांसह स्वस्त गृहकर्ज आदी कारणे आहेत. या सर्वांचा सकारात्मक परिणाम रिअल इस्टेट क्षेत्रावर होत आहे. रिअल इस्टेटचे देशाच्या जीडीपीत ७ ते ८ टक्क्यांपर्यंत प्रत्यक्ष योगदान आहे. या क्षेत्रातील वाढीमुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या जोडलेल्या जवळपास २०० हून जास्त क्षेत्राला फायदा मिळत आहे. सिमेंट, स्टील आणि निर्मिती सामग्रीच्या मागणीशिवाय गृहकर्ज क्षेत्र आणि रोजगारातही वृद्धी पाहायला मिळू शकते.

बातम्या आणखी आहेत...