आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटी:जीएसटीचे दर तर्कसंगत करण्यासाठी मंत्रिगटाची उद्या दिल्लीत बैठक

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीएसटी दराच्या टप्प्यात बदल करण्याचा निर्णय लवकरच होऊ शकतो. जीएसटीचे दर तर्कसंगत करण्यासाठी स्थापन झालेल्या मंत्रिगटाची (जीओएम) बैठक शुक्रवारी होईल. देशात सध्या जीएसटीचे ५%, १२%, १८% आणि २८% असे चार दर आहेत. ते तीन करण्याचा प्रस्ताव असून त्यावर जीओएम अंतरिम अहवाल लवकरच सोपवू शकतो. त्यानंतर या महिन्याच्या अखेरपर्यंत जीएसटी परिषदेची बैठक होईल, त्यात इतर चर्चेसोबत जीओएमच्या अंतरिम अहवालावरही चर्चा होईल. तथापि, अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनुसार सध्या महागाई विक्रमी पातळीवर आहे, त्यामुळे जीएसटी दर तर्कसंगत करण्याची सध्या फार शक्यता नाही.

बातम्या आणखी आहेत...