आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुधारणा:सलग तिसऱ्या महिन्यात जीएसटी संकलन 1 लाख कोटी रुपयांवर, गेल्या सप्टेंबरच्या 91,916 कोटींच्या तुलनेत या सप्टेंबरमध्ये 1.17 लाख कोटी

नवी दिल्ली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुसऱ्या सहामाहीतही हाच कल राहील : अर्थ मंत्रालय

नुकत्याच संपलेल्या सप्टेंबर महिन्यात जीएसटी संकलन सलग तिसऱ्या महिन्यात १ लाख काेटी रुपयांवर म्हणजे १,१७,०१० काेटी रुपयांवर गेले आहे. सप्टेंबर २०२० च्या तुलनेत २३ टक्के आणि काेविडपूर्व पातळी म्हणजे सप्टेंबर २०१९ च्या तुलनेत ते २७ टक्के जास्त आहे. ही आकडेवारी देशाच्या परिस्थितीत लक्षणीय सुधारणा हाेत असल्याचे द्याेतक आहे. या अगाेदर ऑगस्टमध्ये जीएसटी संकलन १.१२ लाख काेटी रुपये तर जुलैमध्ये १.१६ लाख काेटी रुपये झाले हाेते. या बळावर चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जीएसटीचे सरासरी संकलन दरमहा १.१५ लाख कोटी रुपये होते. पहिल्या तिमाहीत ते १.१० लाख कोटींच्या सरासरी संकलनापेक्षा५ % जास्त आहे. यामुळे सरकारला खर्च वाढण्यास मदत होईल

संकलन वाढण्याचे कारण

  • गेल्या काही महिन्यांतील वेगवान आर्थिक वाढ
  • करचोरीच्या विरोधात जोरदार मोहीम
  • देशातील ग्राहकांच्या मागणीत झपाट्याने वाढ

दुसऱ्या सहामाहीतही हाच कल राहील : अर्थ मंत्रालय

अर्थव्यवस्थेची गाडी पुन्हा वेगाने रुळावर येत असल्याचे संकेत जीएसटीच्या अाकडेवारीवरून मिळतात. दुसऱ्या सहामाहीत जीएसटी संकलनात वाढ कायम राहील, असा विश्वास अर्थ मंत्रालयाने व्यक्त केला अाहे.

बातम्या आणखी आहेत...