आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • GST Collection In October 1.52 Lakh Crore, 17% Higher Than Last Year, Maharashtra Tops In Tax Collection

ऑक्टोबरमध्ये 1.52 लाख कोटींचे GST संकलन:गतवर्षीच्या तुलनेत 17% जास्त, कर संकलनात महाराष्ट्र टॉपवर

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये GST कलेक्शन वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्ये 1.52 लाख कोटींचे GST कलेक्शन झाले आहे, जे सप्टेंबरमधील 1.47 लाख कोटींपेक्षा जास्त आहे. त्यात गतवर्षाच्या आधारावर (YOY) 17% वाढ दिसून आली आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये, GST संकलन 1.30 लाख कोटी रुपये होते.

एकूण GST संकलन 1,51,718 लाख कोटी रुपये होते. यामध्ये CGST रु. 26,039 कोटी, SGST रु. 33,396 कोटी, IGST रु. 81,778 कोटी (रु. 37,297 कोटींच्या आयातीतून कमावलेले) आणि सेसमधून 10,505 कोटी रुपये (आयातीतून गोळा केलेले 825 कोटी रुपये) सरकारच्या तिजोरीत आले.

एप्रिलमध्ये GST संकलनाचा विक्रम

आतापर्यंतचे सर्वात मोठे GST संकलन एप्रिल महिन्यात झाले आहे. एप्रिलमध्ये 1.67 लाख कोटी रुपयांचे GST संकलन झाले होते. एप्रिल 2022 मध्ये पहिल्यांदाच GST संकलन 1.5 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले होते.

GST संकलनात ही राज्ये आघाडीवर

ऑक्टोबर 2022 मध्ये GST संकलनाच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या 5 राज्यांमध्ये आघाडीवर आहे. गतवर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रात GST संकलन 19% ने वाढून 23,037 कोटी रुपये झाले आहे. या यादीत 10,996 कोटींच्या कलेक्शनसह कर्नाटक दुसऱ्या, तर तामिळनाडू 9,540 कोटींच्या कलेक्शनसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

राज्य

सप्टेंबर -21

सप्टेंबर-22

ग्रोथ

जम्मू आणि कश्मीर

648425-34%

हिमाचल प्रदेश

68978414%

पंजाब

1,5951,76010%

चंदिगड

15820328%

उत्तराखंड

1,2591,61328%

हरियाणा

5,6067,66237%

दिल्ली

4,0454,67015%

राजस्थान

3,4233,76110%

उत्तर प्रदेश

6,7757,83916%

बिहार

1,3511,344-1%

सिक्कीम

2572653%

अरुणाचल प्रदेश

476539%

नागालँड

384313%

मणिपूर

6450-23%

मिझोराम

3224-23%

त्रिपुरा

677614%

मेघालय

14016417%

आसाम

1,4251,244-13%

पश्चिम बंगाल

4,2595,36726%

झारखंड

2,3702,5005%

ओडिशा

3,5933,7695%

छत्तीसगड

2,3922,328-3%

मध्य प्रदेश

2,6662,92010%

गुजरात

8,4979,46911%
दमन आणि दीव0020%

दादरा आणि नगर हवेली

2692794%

महाराष्ट्र

19,35523,03719%

कर्नाटक

8,25910,99633%

गोवा

31742032%
लक्षद्वीप2214%

केरळ

1,9322,48529%

तामिळनाडू

7,6429,54025%

पुडुचेरी

15220434%

अंदमान निकोबार

2623-10%

तेलंगण

3,8544,28411%

आंध्र प्रदेश

2,8793,57924%

लडाख

193374%

अन्य टेरेटरी

13722766%

सेंटर ज्युरिडिक्शन

189140-26%

टोटल

96,4301,13,59618%

* आकडे कोटी रुपयांत

*मालाच्या आयातीवरील GST वरील तक्त्यामध्ये समाविष्ट नाही.

GST चे 4 स्लॅब

GSTमध्ये 5, 12, 18 आणि 28% असे चार स्लॅब आहेत. तथापि, सोने आणि सोन्याच्या दागिन्यांवर 3% कर आकारला जातो. काही अनब्रँडेड आणि अनपॅक नसलेली उत्पादनेदेखील आहेत ज्यांना GST लागू होत नाही.

बातम्या आणखी आहेत...