आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GST संकलन 28 टक्क्यांनी वाढले:जुलैत जीएसटीमध्ये 1.49 लाख कोटी मिळाले, मार्च-2022 पासून GST मधून 1.40 लाख कोटीपेक्षा जास्त

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुलै महिन्यात जीएसटी संकलन 1.49 लाख कोटींचे झालेले आहे. एका वर्षापूर्वीच्या तुलनेत ही वाढ 28 टक्क्यांनी झाली आहे. जुलै 2021 मध्ये जीएसटी संकलन 1.16 कोटी रुपये होते. तर जूनमध्ये ते 1.45 लाख कोटी रुपये होते. आत्तापर्यंतचे मोठे जीएसटी संकलन एप्रिल महिन्यात होते. जुलैमध्ये संकलन हे दुसरे मोठे GST संकलन आहे. मार्चपासून जीएसटी 1.40 लाख कोटींच्यावर राहीला आहे.

जुलैमध्ये CGST 25,751 कोटी, SGST रु. 32,807 कोटी, IGST 79,518 कोटी आणि उपकर 10,920 होता. यापूर्वी जूनमध्ये CGST 25,306 कोटी, SGST 32,406 कोटी, IGST 75,887 कोटी आणि GST भरपाई उपकर 11,018 कोटी होता. दुसरे म्हणजे मे महिन्यात CGST 25,036 कोटी, SGST रु. 32,001 कोटी, IGST रु. 73,345 कोटी आणि उपकर रु. 10,502 कोटी होता. जीएसटी लागू झाल्यानंतर ही सहावी वेळ आहे आणि मार्च 2022 पासून सलग पाचव्यांदा जीएसटी संकलन 1.40 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.

एप्रिलमध्ये जीएसटी संकलनाचा विक्रम

एप्रिल 2022 मध्ये पहिल्यांदाच GST संकलन 1.5 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले होते. एप्रिलमध्ये एकूण GST महसूल 1,67,540 कोटी रुपये नोंदवला गेला. यामध्ये सीजीएसटी ३३,१५९ कोटी रुपये, एसजीएसटी ४१,७९३ कोटी रुपये, आयजीएसटी ८१,९३९ कोटी रुपये आणि सेस १०,६४९ कोटी रुपये होता.​​​​​​

जीएसटी संकलनात ही राज्य आघाडीवर
जून 2022 मध्ये जीएसटी संकलनाच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या 5 राज्यांमध्ये आघाडीवर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रात जीएसटी संकलन 17 टक्क्याने वाढून 22,129 कोटी रूपये झाले आहे. या यादीत 9,795 कोटींच्या कलेक्शनसह कर्नाटक दुसऱ्या तर गुजरात 9,183 कोटींच्या कलेक्शनसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

राज्य

जुलै- 21

जुलै -22

वाढ

जम्मू आणि कश्मीर

4324310%

हिमाचल प्रदेश

66774612%

पंजाब

1,5331,73313%

चंदीगढ

1691764%

उत्तराखंड

1,1061,39026%

हरियाणा

5,3306,79127%

दिल्ली

3,8154,32713%

राजस्थान

3,1293,67117%

उत्तर प्रदेश

6,0117,07418%

बिहार

1,2811,264-1%

सिक्कीम

19724926%

अरुणाचल प्रदेश

556518%

नागालॅंड

284248%

मणिपुर

374520%

मिझोराम

212727%

त्रिपुरा

6563-3%

मेघालय

12113814%

आसाम

8821,04018%

पश्चिम बंगाल

3,4634,44128%

झारखंड

2,0562,51422%

ओडीसा

3,6153,6521%

छत्तीसगड

2,4322,69511%

मध्य प्रदेश

2,6572,96612%

गुजरात

7,6299,18320%
दमन आणि दीव00-66%

दादरा और नगर हवेली

22731338%

महाराष्ट्र

18,89922,12917%

कर्नाटक

6,7379,79545%

गोवा

30343333%
लक्षद्वीप1269%

केरळ

1,6752,16129%

तमिळनाडू

6,3028,44934%

पॉंडेचरी

12919854%

अंदमान निकोबार

192326%

तेलंगाना

3,6104,54726%

आंध्र प्रदेश

2,7303,40925%

लदाख

132054%

अन्य टेरेटरी

14121654%

सेंटर ज्यूरिडिक्शन

1611620%

टोटल

87,6781,06,58022%
  • आकडे कोटी रूपयात.
  • मालाच्या आयातीवरील जीएसटी वरील तक्त्यात समावेश.

दर वाढल्याले जीएसटी संकलन वाढण्याची शक्यता

येत्या काही दिवसांत जीएसटी संकलनात वाढ होण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे जीएसटी कौन्सिलच्या जून महिन्यात झालेल्या बैठकीत काही गोष्टींवर जीएसटी वाढवून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटीच्या दरात वाढ झाल्यामुळे दही, लस्सी, तांदूळ, मैदा यांसह अनेक जीवनावश्यक वस्तू महागल्या आहेत. आता टेट्रापॅक केलेले दही, लस्सी आणि बटर मिल्कवर 5 टक्के जीएसटी आणि अनब्रँडेड प्री-पॅकेज्ड आणि प्री-लेबल नसलेल्या आटा आणि डाळीवर 5 टक्के GST आकारला जात आहे. नवीन दर 18 जुलैपासून लागू झाले आहेत.

जीएसटीचे चार स्लॅब, सोन्यावर 3 टक्के कर

जीएसटीमध्ये 5, 12, 18 आणि 28 टक्के असे चार स्लॅब आहेत. तथापि, सोने आणि सोन्याच्या दागिन्यांवर ३ टक्के कर आकारला जातो. काही अनब्रँडेड आणि अनपॅक नसलेली उत्पादने देखील आहेत. ज्यांना GST लागू होत नाही.

बातम्या आणखी आहेत...