आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • GST Collection October 2021 | Goods And Service Tax Collection Is Rs 1.30 Lakh Ahead Diwali

अर्थव्यवस्थेत तेजी:ऑक्टोबरमध्ये GST कलेक्शन 1.30 लाख कोटी रुपये, विक्रमाचा दुसरा महिना

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सणासुदीच्या काळात वस्तू आणि सेवा कर (GST) कलेक्शनने विक्रम केला आहे. ऑक्टोबर महिन्यात GST कलेक्शन 1.30 लाख कोटी रुपये झाले आहे. एप्रिल 2017 मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर एवढे कलेक्शन होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी एप्रिल 2021 मध्ये जीएसटीमधून 1.41 लाख कोटी रुपयांचे कलेक्शन झाले होते.

24% वार्षिक वाढ
अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2021 मध्ये जीएसटीचे एकूण संकलन 130,127 कोटी रुपये होते. वार्षिक आधारावर जीएसटी संकलनात 24% वाढ झाली आहे. तर 2019 च्या ऑक्टोबरच्या तुलनेत त्यात 36% वाढ झाली आहे. सप्टेंबर 2021 च्या तुलनेत, त्यावेळी जीएसटी कलेक्शन 1.17 लाख कोटी रुपये होते.

व्यवसाय तेजीत आहे
GST च्या संकलनात झपाट्याने होणारी वाढ व्यवसायात वाढ होत असल्याचे संकेत देत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला देशात कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव दिसत असेल, परंतु तिसऱ्या लाटेचा प्रभाव अद्याप दिसून आलेला नाही. अर्थव्यवस्थेतील सुधारणांमुळे सलग चौथ्या महिन्यात जीएसटी कलेक्शन 1 लाख कोटींच्या पुढे गेले आहे. वित्त मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये जीएसटीचे एकूण कलेक्शन 1.12 लाख कोटी रुपये होते, तर जुलैमध्ये ते 1.16 लाख कोटी रुपये होते.

जूनमध्ये 1 लाख कोटींपेक्षा कमी होते कलेक्शन
जूनमध्ये 92,849 कोटी रुपये, तर एप्रिल आणि मेमध्ये जीएसटी कलेक्शन 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. कोरोनाचा कमी प्रभाव आणि जलद लसीकरणामुळे आता देशात सर्व सेक्टर्स सुरू झाले आहेत. अगदी सिनेमा हॉल आणि स्विमिंग पूलपासून ते शाळा-कॉलेजही आता सुरू होत आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्था खुली झाल्याने व्यवसाय पुन्हा रुळावर आला आहे. यामुळे जीएसटी केल्कशनमध्ये वेग येत आहे.

CGST ची भागिदारी 23,861 कोटी रुपये
सरकारने सांगितले की, ऑक्टोबरमध्ये CGST कलेक्शनमध्ये CGST ची भागीदारी 23,861 कोटी रुपये, SGST ची भागिदारी 30,421 कोटी रुपये आणि IGST ची भागिदारी 67,361 कोटी रुपये होती. वस्तूंच्या आयातीवर 32,998 कोटी रुपये IGST जमा झाला. 8,484 कोटी सेस म्हणून प्राप्त झाले.

ई-बिल चांगले ट्रेंडिंग
एका निवेदनात सरकारने म्हटले आहे की, दर महिन्याला तयार होणाऱ्या ई-बिलांच्या ट्रेंडवरून हे स्पष्ट होते की व्यवसाय तेजीत आहे. सेमीकंडक्टर आणि इतर चिप्समुळे ऑटो आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या विक्रीवर परिणाम झाला नसता, तर जीएसटी कलेक्शन जास्त झाले असते, असे मंत्रालयाने म्हटले आहे. प्रत्यक्षात चिप्सच्या कमतरतेमुळे यावेळी ऑटो आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर वाईट परिणाम होत आहे. चिपच्या तुटवड्यामुळे सप्टेंबरमध्ये त्यांच्या 1.66 लाख वाहनांच्या विक्रीत घट झाल्याचे मारुतीसारख्या कंपन्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...