आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटी संकलन:सरकारने मे महिन्यात 1.40 लाख कोटी रुपये कमावले, गेल्या वर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत 44% अधिक

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मे 2022 मध्ये जीएसटीच्या माध्यमातून जमा झालेला महसूल 1,40,885 कोटी रुपये होता. गेल्या वर्षी याच कालावधीत ते 97,821 कोटी रुपये संकलीत झाले होते. म्हणजेच मे 2021 च्या तुलनेत GST महसुलात 44% वाढ नोंदवण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयाने बुधवारी ही आकडेवारी जाहीर केली.

यामध्ये CGST च्या माध्यमातूमन 25,036 कोटी, SGST च्या माध्यमातून 32,001 कोटी आणि IGST च्या माध्यमातून 73,345 कोटी रुपये तसेच उपकरातून 10,502 कोटी रुपयांचा महसूल सरकारी तिजोरीत आला आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये जीएसटी संकलन 1,67,540 कोटी रुपये होते. जीएसटी लागू झाल्यानंतर ही चौथी वेळ आहे आणि मार्च 2022 पासून सलग तिसऱ्यांदा जीएसटी संकलन 1.40 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.

एप्रिलमध्ये जीएसटी संकलनाचा विक्रम

एप्रिल 2022 मध्ये पहिल्यांदाच जीएसटी संकलन 1.5 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले. एप्रिलमध्ये एकूण GST महसूल 1,67,540 कोटी रुपये नोंदवला गेला. यामध्ये सीजीएसटी 33,159 कोटी रुपये, एसजीएसटी 41,793 कोटी रुपये, आयजीएसटी 81,939 कोटी रुपये आणि सेस 10,649 कोटी रुपये होता. यापूर्वी मार्चमध्ये, जीएसटी संकलन 1,42,095 कोटी रुपये होते, जे मागील कोणत्याही महिन्यातील सर्वोच्च जीएसटी संकलन होते.

जीएसटी संकलनात महाराष्ट्र आघाडीवर

मे 2022 मध्ये जीएसटी संकलनाच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या 5 राज्यांमध्ये आघाडीवर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रात जीएसटी संकलन 50 टक्क्यांनी वाढून 20 हजार 313 कोटी रुपये झाले आहे. या यादीत गुजरात आणि कर्नाटक दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

जीएसटी संकलनाच्या बाबतीत अव्वल 5 राज्ये

राज्यमे 2021मे 2022वाढ
महाराष्ट्र13,56520,31350%
गुजरात6,3829,32146%
कर्नाटक5,7549,23260%
तामिळनाडू5,5927,91041%
उत्तर प्रदेश4,7106,67042%

GST चे 4 स्लॅब

जीएसटीमध्ये 5, 12, 18 आणि 28% असे चार स्लॅब आहेत. या व्यतिरीक्त सोने आणि सोन्याच्या दागिन्यांवर 3% कर आकारला जातो. काही अनब्रँडेड आणि अनपॅक नसलेली उत्पादने देखील आहेत ज्यांना GST लागू होत नाही.

बातम्या आणखी आहेत...