आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Business
 • GST Collection On One Lakh Crore, 14% Higher Than August 2019; News And Live Updates

आर्थिक बळकटी:जीएसटी संकलन एक लाख कोटींवर, ऑगस्ट- 2019 पेक्षा 14% जास्त

नवी दिल्ली25 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • जीडीपीच्या चांगल्या डेटानंतर आता जीएसटीचे सुखद चित्र समोर

महामारीदरम्यान कर संकलनाच्या आघाडीवर सरकार काही महिन्यांपासून बऱ्याच दिलासादायक स्थितीत आहे. ऑगस्टमध्ये सलग दुसरा महिना जीएसटी संकलन एक लाख कोटी रुपयांवर राहिले. मात्र, हे जुलैच्या तुलनेत थोडे कमी आहे, मात्र गेल्या वर्षी ऑगस्टपासून ३०% आणि ऑगस्ट २०१९ मध्ये जीएसटी संकलनापेक्षा १४% जास्त आहे. वित्त मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यातील जीएसटी संकलन १.१२ लाख कोटी रुपयांपेक्षा काहीसे जास्त आहे. याच्या तुलनेत जुलैमध्ये १.१६ लाख कोटींचे संकलन झाले होते. मात्र, ऑगस्ट २०२० मध्ये ८६,४४९ कोटी रु. आणि महामारी सुरू होण्याआधी ऑगस्ट २०१९ मध्ये ९८,२०२ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते.

गेल्या महिन्यात सर्वात जास्त १५,१७५ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन महाराष्ट्रात झाले. ७,५५६ कोटी जीएसटी संकलनासह गुजरात याबाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आणि ७,४२९ कोटी संकलनासह कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे. निर्यातीतील वाढ, करचोरांवर कारवाई व बनावट बिलांवर लावलेल्या बंदीमुळे जीएसटी संकलनात वाढ दिसली. इक्राच्या अदिती नायर म्हणाल्या, जीएसटी संकलन दुसऱ्या महिन्यात व गेल्या ११ महिन्यांत १० व्यांदा एक लाख कोटींवर जाणे निरोगी अर्थव्यवस्थेचे संकेत आहेत.

कर्नाटक, तामिळनाडूत ३५% वाढले जीएसटी

 • राज्य ऑगस्ट 20 ऑगस्ट 21 वृद्धी (%)
 • महाराष्ट्र 11,602 15,175 31%
 • गुजरात 6,030 7,556 25%
 • कर्नाटक 5,502 7,429 35%
 • तामिळनाडू 5,243 7,060 35%
 • उत्तर प्रदेश 5,098 5,946 17%

ऑगस्टमध्ये जीएसटी संकलनाचा हिशेब

 • केंद्रीय जीएसटी 20,522
 • राज्य जीएसटी 26,605
 • एकीकृत जीएसटी 56,247
 • सेस संकलन 8,646
 • एकूण संकलन 1,12,020
बातम्या आणखी आहेत...