आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GST कलेक्शनचा नवीन रेकॉर्ड:मार्चमध्ये मिळाला 1.23 लाख कोटी रुपयांचा रेव्हेन्यू, हे आतापर्यंतचे सर्वाधिक कलेक्शन

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सलग 6 महीन्यांपासून 1 लाख कोटींपेक्षा जास्तीचे GST कलेक्शन

देशाची अर्थव्यवस्था हळु-हळू पटरीवर येत आहे. यामुळेच मार्चमध्ये वस्तु आणि सेवा कर (GST) कलेक्शनने नवीन उच्चांक गाठला आहे. सरकारी डेटानुसार, मार्चमध्ये GST कलेक्शन 1,23,902 कोटी रुपये झाले आहे. यंदा मागच्या वर्षीपेक्षा 27% जास्तीची ग्रोथ आहे. मार्च 2020 मध्ये GST कलेक्शन 97,590 कोटी रुपये होते. मागील सहा महिन्यांपासून GST कलेक्शन 1 लाख कोटींच्या पुढे राहिले आहे.

अर्थ मंत्रालयाने सांगितले की, GST लागू झाल्यानंतर मार्च 2021 मध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक कलेक्शन यंदा झाले आहे. यासह मागील पाच महिन्यांपासून सुरू असलेला गतीचा ट्रेंडही कायम आहे. डेटानुसार, वस्तुच्या आयातीतून मिळणाऱ्या GST मध्ये 70% ग्रोथ झाले, तर देशांतर्गत ट्रांजेक्शनमधून मिळणारा महसूल 17% वाढला आहे.

कुठून किती कलेक्शन झाले ?

डेटानुसार, सरकारला CGST तून 22,973 कोटी रुपये, SGST तून 29,329 कोटी रुपये आणि IGST तून 62,842 कोटी रुपये मिळाले. IGST मध्ये आयात होणाऱ्या वस्तुमधून 31,097 कोटी रुपये आणि सेसमधून 8,757 कोटी रुपेय मिळाले. IGST मधील 21,879 कोटी रुपये CGST आणि 17,320 कोटी रुपये SGST मध्ये सेटल केले आहेत.

मार्च 2021 मध्ये GST कलेक्शनमधील टॉप-5 राज्य

राज्यकलेक्शन (कोटी रुपये)
महाराष्ट्र17,038.049
गुजरात8,197.04
कर्नाटक7,914.98
तामिळनाडू7,579.18
उत्तर प्रदेश6,265.01
बातम्या आणखी आहेत...