आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अनलॉकनंतर आर्थिक बाबी हळुहळू पुर्ववत येत आहेत. यामुळेच डिसेंबरमध्ये गुड्स अँड सर्विसेज टॅक्स (GST) कलेक्शन परत एकदा एक लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. अर्थ मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2020 मध्ये 1.15 लाख कोटी रुपयांचे GST कलेक्शन झाले. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये 1 लाख 5 हजार 155 आणि नोव्हेंबरमध्ये 1 लाख 4 हजार 963 कोटी रुपयांचे GST कलेक्शन झाले होते.
अर्थ मंत्रालयाचे म्हणने आहे की, GST सिस्टम लागू झाल्यानंतर डिसेंबरमध्ये सर्वाधिक कलेक्शन झाले आहे. यापूर्वी एप्रल 2019 मध्ये सर्वाधिक 1 लाख 13 हजार 866 कोटी रुपयांचे कलेक्शन झाले होते.
31 डिसेंबरपर्यंत 87 लाख GSTR-3B फाइल झाले
अर्थ मंत्रालयाने सांगितल्यानुसार, डिसेंबरमध्ये 21 हजार 365 कोटी रुपये CGST, 27 हजार 804 कोटी रुपये SGST आणि 57 हजार 426 कोटी रुपयांचे IGST मिळाले. IGST मध्ये वस्तुंच्या आयातीमुळे मिळालेले 27 हजार 50 कोटी रुपयेदेखील सामील केले आहेत. याशिवाय, 8,579 कोटी रुपये सेस मिळाला आहे. यात आयात केलेल्या वस्तुंवर लावलेला 971 कोटी रुपयांचा सेसदेखील सामील आहे. 31 डिसेंबर 2020 पर्यंत 87 लाख GSTR-3B रिटर्न फाइल झाले होते.
सेटलमेंटनंतर केंद्र सरकारला 44 हजार 641 कोटी रुपये मिळाले
अर्थ मंत्रालयानुसार, सरकारने IGST कडून रेग्युलर सेटलमेंटच्या रुपात 23 हजार 276 कोटी रुपये CGST मध्ये सेटल केले. तर, 17 हजार 681 कोटी रुपये SGST मध्ये सेटल केले. सर्व रेग्युलर सेटलमेंटनंतर डिसेंबर 2020 मध्ये केंद्राला CGST म्हणून 44 हजार 641 कोटी रुपये आणि राज्य सरकारांना SGST च्या रुपात 45 हजार 485 कोटी रुपये मिळाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.