आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • GST Council Meeting Today : Meeting Will Be Held On December 31 Under The Chairmanship Of Finance Minister Sitharaman, Discussion On GST Rates Can Be Done

GST काउंसिलची बैठक:​​​​​​​टेक्सटाइलवर टॅक्स 5% वरुन 12% करण्याचा निर्णय मागे, राज्य सरकार आणि इंडस्ट्री करत होती विरोध

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षेखाली शुक्रवारी झालेल्या GST काउंसिलच्या बैठकीमध्ये टेक्सटाइलवर टॅक्स वाढवण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशचे इंडस्ट्री मिनिस्टर बिक्रम सिंह यांनी याविषयीय माहिती दिली.

बिक्रम सिंह म्हणाले, 'जीएसटी कौन्सिलने कापडावरील जीएसटी दर (5% वरून 12%) वाढवण्याचा निर्णय तूर्तास पुढे ढकलला आहे. परिषद फेब्रुवारी 2022 मध्ये पुढील बैठकीत या प्रकरणाचा आढावा घेईल. जीएसटी बैठकीत झालेल्या निर्णयांबाबत दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद होणार आहे.

गेल्या बैठकीत सरकारने करवाढीचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी 1 जानेवारीपासून होणार होती. पश्चिम बंगालचे माजी अर्थमंत्री अमित मित्रा यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना वस्त्रोद्योगाची प्रस्तावित दरवाढ मागे घेण्याची विनंती केली होती. याशिवाय तेलंगणाचे उद्योगमंत्री केटी रामाराव यांनीही विरोध केला.

टॅक्स स्लॅबवर चर्चा
सध्या जीएसटी 5, 12, 18 आणि 28% अशा चार स्लॅबमध्ये आकारला जातो. जीवनावश्यक वस्तूंना एकतर जीएसटीमधून सूट देण्यात आली आहे किंवा त्यांच्यावर कमी कर आकारला जातो, तर लक्झरी वस्तूंवर अधिक कर आकारला जातो. याशिवाय काही सेस (उपकर) देखील तरतूद आहे.

12 आणि 18% च्या स्लॅबचे एकत्रीकरण करण्याची आणि महसुलावरील परिणाम दूर करण्यासाठी काही बाबी सूट श्रेणीतून काढून टाकण्याची मागणी परिषदेसमोर करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...