आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • GST Council To Hold A Meeting On 28 May, Piped Natural Gas May Become Cheaper, GST Rate On Two Wheelers May Be Reduced; News And Live Updates

GST परिषदेची 28 मे ला बैठक:दुचाकी वाहनांवरील कराच्या दरात कपात करण्याची अपेक्षा; GST प्रणालीत आल्यामुळे PNG होऊ शकते स्वस्त

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इन्व्हर्टेड ड्युटीची रचना सुधारण्यासाठी संभाव्य उपाययोजनांची घोषणा

देशात कोरोना महामारीमुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशातच जीएसटी परिषदेकडून दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. कारण आपल्या घरांमध्ये पाईपद्वारे येणारा गॅस- PNG आणि दुचाकींच्या किंमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण GST परिषद नैसर्गिक गॅसला जीएसटी प्रणालीत आणण्याचा विचार करीत असून यामुळे पीएनजी गॅस अधिक स्वस्त होऊ शकते.

तर दुसरीकडे पीएनजी गॅस आणि दुचाकीवंरील कराच्या दरात कपात करण्याची अपेक्षा आहे. जीएसटी परिषद हे महत्वाचे दोन्ही निर्णय येत्या 28 मे ला आपल्या बैठकीत घेऊ शकते. कारण कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेनंतरची ही पहिलीच बैठक असणार आहे.

इन्व्हर्टेड ड्युटीची रचना सुधारण्यासाठी संभाव्य उपाययोजनांची घोषणा
येत्या 28 मे ची जीएसटी परिषदेच्या बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होत आहे. सदर बैठकीत इनव्हर्टेड ड्युटीची रचना निश्चित करण्याच्या उपायांची घोषणा देखील केली जाऊ शकते. दरम्यान, या बैठकीत चालू आर्थिक वर्षाच्या सेस कलेक्शनात घट होण्याच्या शक्यतेवर कम्पनसेशन सेसवर चर्चा केली जाऊ शकते.

जीएसटी परिषदेची शेवटची बैठक गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झाली होती. मागील बैठकीत जीएसटी संकलन कमी करण्यासह केंद्राच्या कर्ज घेण्याच्या फॉर्म्युलावर आणि त्याच्या भरपाईवर चर्चा झाली होती.

निर्मला सीतारमण बैठकीच्या अध्यक्षस्थानी राहतील
28 मे रोजी होणार्‍या 43 व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत अध्यक्षस्थानी निर्मला सीतारमण उपस्थित राहणार असल्याची माहिती अर्थमंत्री कार्यालयाने सोशल मीडियावर दिली. या बैठकीला अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर उपस्थित राहणार असून राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे वरिष्ठ अधिकार्‍यांचादेखील समावेश असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...