आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुधारणा:जीएसटी वसुली आणि पेट्रोल, डिझेलची वाढती विक्री व्ही-शेप रिकव्हरीचे संकेत

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीआयआयचा दावा- अर्थव्यवस्थेत वेगाने सुधारणा

अनलॉकच्या प्रक्रियेमुळे अर्थव्यवस्था वेगाने रुळावर येत आहे. एप्रिलमध्ये सर्वकाही ठप्प होते. आता जीएसटी वसुली, पेट्रोल-डिझेलची विक्री, टोल वसुलीतील वाढीमुळे चांगल्या रिकव्हरीचे संकेत मिळाले आहेत. हाच कल कायम राहिल्यास व्ही-शेप रिकव्हरी म्हणजे अर्थव्यवस्था वेगाने रुळावर येईल. हा दावा सीआयआयचे महासंचालक चंद्रजित बॅनर्जी यांनी केला. ते म्हणाले, एनबीएफसी सेक्टरकडून ग्रामीण भागाला दिले जाणारे कर्ज सामान्य पातळीच्या ८०% वर पोहोचले आहे.

असे मिळाले जलद रिकव्हरीचे संकेत

> जूनमध्ये प्रवासी वाहनांची विक्री फेब्रुवारीच्या ४२ % पर्यंत पोहोचली. दुचाकी विक्रीत ७८% रिकव्हरी झाली आहे.

> ट्रॅक्टरच्या विक्रीत लक्षणीय वाढ दिसली. फेब्रुवारीच्या तुलनेत १६० % वर.

> रेल्वेतील मालवाहतूक ८८% वर पोहोचली.

> पेट्रोल ८९% व डिझेलच्या विक्रीमध्ये ८८ % रिकव्हरी झाली आहे.

> जीएसटी वसुली ८७% पातळीवर आहे.

> डिजिटल रिटेल व्यवहार ७६% वर आले.