आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएखादा ज्वेलर साेन्याचे जुने दागिने जसेच्या तसे विकत असल्यास त्यास यात हाेणाऱ्या नफ्यावरच जीएसटी द्यावा लागेल, असा निर्णय अॅडव्हान्स रुलिंग अॅथाॅरिटी (एएआर) कर्नाटकने दिला आहे. बंगळुरूची कंपनी आद्या गाेल्ड प्रायव्हेट लि. ने एएआरमकडे अर्ज करून याबाबत स्पष्टीकरण मागवले होते. त्यावर एएआरने स्पष्ट केले की, जीएसटी केवळ विक्री मूल्य आणि खरेदी मूल्याच्या फरकावरच द्यावा लागेल. अर्जदाराकडून दागिने वितळवून ते बुलियनमध्ये परावर्तित केले जात नाहीत. नवे दागिने बनवले जात नाहीत तर अर्जदार (ज्वेलरी कंपनी) केवळ जुने दागिने स्वच्छ आणि त्यांना पॉलिश करून विकते.
चार्टर्ड अकाउंटंट कीर्ती जोशी म्हणाल्या की, बहुतेक ज्वेलर्स जुने दागिने सामान्य लोक आणि अनोंदणीकृत डीलर्सकडून खरेदी करतात. पण मूळ ग्राहकाने दागिने खरेदी करताना ३ टक्के जीएसटी दिलेला असतो. त्यावर जीएसटी लावण्याचे कारणच नाही. ज्वेलर्सला जुन्या दागिन्यांचे खरेदी आणि पुनर्विक्री मूल्याच्या फरकावर जीएसटी लावला पाहिजे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.