आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणूक मंत्रा:अतिरिक्त उत्पन्नाचा निश्चित मार्ग आहे गॅरंटेड इन्कम प्लॅन

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गॅरंटेड इन्कम प्लॅनमध्ये पॉलिसीचा कालावधी संपल्यानंतर विमाधारकाला निश्चित उत्पन्न मिळते. याचे पेमेंट पॉलिसीचे नियम, अटींनुसार मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक असू शकते. पोर्टफोलिओत गॅरंटेड इन्कम प्लॅनचा समावेश करण्याचे कोणते फायदे आहेत, हे समजून घेऊ.

भविष्यातील गरजा भागवण्यास मदत : गॅरंटेड इन्कम प्लॅनमुळे भविष्यातील खर्चांची सोय होते. यापासून मिळणाऱ्या नियमित उत्पन्नामुळे तुम्ही गृहकर्ज किंवा मुलांचा शैक्षणिक खर्च भागवू शकता.

उत्पन्नाचा अतिरिक्त मार्ग : महागाईत वाढत्या खर्चाचा ताळमेळ घालण्यात याची मदत होते. अतिरिक्त उत्पन्नामुळे कामकाजाच्या दिवसांत तुम्हाला अतिरिक्त सहकार्य मिळू शकते. निवृत्तीनंतरही उत्पन्न सुरू राहते.

बाजाराच्या चढ-उतारात सुरक्षा : तुमच्या पोर्टफोलिओत इक्विटी गुंतवणूक अधिक असेल तर जोखीम जास्त असते. बाजारात घसरणीमुळे नुकसान होऊ शकते. बाजारात अनिश्चितता असली तरी गॅरंटेड इन्कम प्लॅन निश्चित आणि नियमित उत्पन्न देते. या तीन मुख्य फायद्यांसह गॅरंटेड इन्कम प्लॅनचे आणखीही फायदे आहेत. हे फायनांन्शियल प्रॉडक्ट वेगवेगळ्या जोखीम क्षमता असलेल्या गुंतवणूकादारांचा हिशेबाने मिळतात. यांच्या प्रीमियमवर करात सवलत मिळते. मॅच्युरिटीनंतर मिळणारी रक्कमही टॅक्स फ्री असते. या दृष्टीने गॅरंटेड इन्कम प्लॅन पोर्टफोलिओला मजबूत बनवतो.

धीरज सहगल, चीफ डिस्ट्रिब्यूशन ऑफिसर- इन्स्टिट्यूशनल, बजाज आलियांझ लाइफ

बातम्या आणखी आहेत...