आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Hackers Steal 1 Thousand Crores Worth Of Cryptocurrency; The Company Closed The Transaction

क्रिप्टोच्या चोरीची प्रकरणेही वाढली:हॅकर्सनी 1 हजार कोटींची क्रिप्टोकरन्सी चोरली; कंपनीने बंद केला व्यवहार

टोरंटो2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिप्टोकरन्सीच्या वाढत्या किमतीसोबतच जगभरात क्रिप्टोच्या चोरीची प्रकरणेही वाढली आहेत. गुरुवारी ऑनलाइन हॅकर्सने बायनेन्स क्रिप्टो एक्सचेंजमधून सुमारे १ हजार कोटी किमतीचे बीएनबी टोकन चोरी केले. या घटनेनंतर बायनेन्सने आपले ब्लॉकचेन नेटवर्क तात्पुरते निलंबित केले आहे. बायनेन्सचे सीईओ चांगपेंग झाओ म्हणाले, आम्ही ट्रान्झअॅक्शन व्हॅलिडेटर्सना बीएससीवर नव्या ब्लॉकची निर्मिती रोखण्यास सांगितले. तसेच यूजर्सचे फंड्स सुरक्षित राहतील, असा त्यांना विश्वास दिला.

---------- इलेक्ट्रिक दुचाकी कंपनी रिव्होल्टमध्ये 100% भागीदारी घेणार रतन इंडिया मुंबई रतन इंडिया एंटरप्रायझेसने इलेक्ट्रिक दुचाकी कंपनी रिव्होल्टमध्ये १००% भागीदारी खरेदीची घोषणा केली आहे. रतन इंडियाच्या अध्यक्षा अंजली रतन यांनी रिव्होल्ट सध्या जगातील सर्वात चांगली इलेक्ट्रिक बाइक असल्याचा दावा केला. ती तंत्रज्ञान, खर्च, दर्जा व परफॉरमन्स सर्वबाबतीत जागतिक पातळीची आहे. त्या म्हणाल्या, देशात ईव्ही क्रांती अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने आणि वेळेपूर्वी येत आहे. कंपनीची आधीपासूनच रिव्होल्टमध्ये ३३.८४% भागीदारी आहे.

बातम्या आणखी आहेत...