आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:30% कर वाचवण्यासाठी निम्मी क्रिप्टो ट्रेडिंग परदेशी एक्स्चेंजद्वारे

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात क्रिप्टोकरन्सीच्या भवितव्याबाबत अनिश्चितता असली तरी २०२० नंतर त्यात सतत गुंतवणूक वाढली आहे. विविध क्रिप्टो एक्स्चेंजच्या आकडेवारीनुसार, १.५-२ कोटी भारतीयांनी क्रिप्टो अॅसेट्समध्ये गुंतवणूक केली आहे. हे जगात सर्वाधिक आहे. मात्र, ३०% कर वाचवण्यासाठी अर्ध्यापेक्षा जास्त ट्रेडिंग परदेशी एक्स्चेंजद्वारे करत आहेत. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात यावर लक्ष देण्यात आलेले नाही. भारतीय क्रिप्टो उद्योगाची प्रतिनिधी संस्था ‘भारत वेब ३ असोसिएशन’चे म्हणणे आहे की, नोव्हेंबर २०२२ पर्यंत भारतात क्रिप्टो अॅसेट्समधील गुंतवणूक १० अब्ज डॉलर (८१८८ कोटी रुपये)च्या वर गेली होती. यामुळे यावरील करापासून सरकारला चांगले उत्पन्न मिळायला हवे होते. मात्र, याच्या एक टक्काही सरकारच्या तिजोरीत आले नाही.

फक्त ६० कोटींचा टीडीएस १४ डिसेंबरला सरकारने संसदेत सांगितले होते की, क्रिप्टोकरन्सीवरील टीडीएसद्वारे फक्त ६०.४६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. याचे कारण म्हणजे लोकांनी कर वाचवण्यासाठी गेल्या वर्षी ६०% क्रिप्टो ट्रेडिंग परदेशी एक्स्चेंजद्वारे केली.

हा डेटा ट्रान्सफरचाही गंभीर मुद्दा क्रिप्टो इन्व्हेस्टमेंट अॅप कॉइनडीसीएक्सचे उपाध्यक्ष राजगोपाल मेनन यांनी सांगितले, हा केवळ ट्रेडिंग व्हॉल्यूम परदेशात जाण्याचा मुद्दा नाही. जे गुंतवणूकदार परदेशी एक्स्चेंजद्वारे ट्रेडिंग करतात त्यांची महत्त्वाची माहिती (जसे खाते क्रमांक, फोन क्रमांक) ही परदेशी एक्स्चेंजच्या हाती लागते. यावर सरकारने लक्ष देण्याची गरज आहे.

एकूण क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये 60% पर्यंत भागीदारी फक्त भारतीयांची 2022 देशांतर्गत एक्सचेंज इंट. एक्सचेंज एकूण वॉल्यूम भारतीय गुंतवणूकदार जाने 15,029,000 10,014,000 25,043,000 60% 40% जून 5,755,000 7,010,000 12,765,000 45% 55% जुलै 3,737,000 4,790,000 8,527,000 44% 56% ऑगस्ट 3,426,346 4,395,927 7,822,273 44% 56% सप्टें 3,174,908 4,239,190 7,414,098 43% 57% अॉक्टो 2,564,117 4,071,633 6,635,750 39% 61% नोव्हें 3,182,256 5,226,257 8,408,513 38% 62% डिसें. 1,961,663 3,721,405 5,683,068 35% 65% (स्रोत: द एस्या)

बातम्या आणखी आहेत...