आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारताच्या जवळपास ५० टक्के नोकरदार महिलांना कोरोना महारोगराईमुळे आधीच्या तुलनेत जास्त तणाव जाणवू लागला आहे. सर्वेक्षणानुसार, या महारोगराईमुळे देशात नोकरदार महिलांवर भावनिकदृष्ट्या परिणाम होत आहे. सर्वेक्षणात समाविष्ट ४७ टक्के महिलांनी सांगितले की, महारोगराईमुळे त्यांना जास्त तणाव किंवा अस्वस्थपणा जाणवत आहे. दुसरीकडे, पुरुषांचा विचार केल्यास त्यांच्यासाठी आकडे थोडे कमी आहेत. ३८ टक्के नोकरदार पुरुषांनी सांगितले की, महारोगराईमुळे त्यांच्यावरील तणाव वाढला आहे. हे सर्वेक्षण २७ जुलैपासून २३ ऑगस्टदरम्यान २,२२५४ व्यावसायिकांमध्ये करण्यात आले. यामध्ये देशातील नोकरदार माता आणि नोकरदार महिलांवर महारोगराईमुळे मुलांच्या पालनपोषणाबाबतची आव्हाने समोर आली आहेत. सर्वेक्षणानुसार, देशाचा एकूण विश्वास हळूहळू वाढत आहे. घरातून काम करणे, अर्थात वर्क फ्रॉम होममुळे नोकरदार मातांच्या अडचणी वाढल्या आहेत. सध्या तीनपैकी एक महिला(३१%) पूर्णवेळ मुलांची देखभाल करत आहे. दुसरीकडे केवळ पाचपैकी एक म्हणजे १७ टक्के पुरुष संपूर्ण वेळ मुलांची देखभाल करत आहेत.
सर्वेक्षणात नमूद केले की, पाचपैकी दोन म्हणजे ४४ टक्के महिलांना आपल्या मुलांच्या देखभालीसाठी कामाच्या तासांपेक्षा जास्त काम करावे लागू शकते. फ्रीलान्सरच्या रूपात काम करणाऱ्या लोकांपैकी २५ टक्क्यांनी सांगितले की, उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. २७ टक्क्यांनी सांगितले की, त्यांची वैयक्तिक बचत वाढण्याची अपेक्षा आहे. ३१ टक्क्यांनी सांगितले की, येत्या सहा महिन्यादरम्यान आपल्या गुंतवणुकीत वाढीची अपेक्षा आहे.
महारोगराई, वर्क फ्रॉम होममुळे महिलांच्या कामाचे तास,समस्या वाढल्या
महारोगराई आणि वर्क फ्रॉम होममुळे महिलांचे काम आणि समस्या वाढल्या आहेत. सर्वेक्षणानुसार, सुमारे ४६ टक्के महिलांनी सांगितले की, मुले घरी असल्यामुळे कामात लक्ष देऊ शकत नाहीत किंवा जास्त काम करावे लागत आहे. पाचपैकी एक म्हणजे २० टक्के महिला आपल्या मुलांच्या देखभालीसाठी कुटुंबातील सदस्य किंवा मित्रांवर अवलंबून आहेत. पुरुषांच्या प्रकरणात हा आकडा ३२ टक्के आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.