आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ग्राउंड रिपोर्ट:चांगल्या उत्पन्नानंतरही जूनमध्ये बाजार समित्यांत निम्माच व्यवसाय

प्रमोद शर्मा, मंदार दवे, महेश जोशी | जयपूर/औरंगाबाद/अहमदाबाद/पाटणा/इंदूर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुजरात अपवाद, येथे व्यवसाय गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढला
Advertisement
Advertisement

रब्बी हंगामात बहुतांश राज्यांत चांगले उत्पन्न साधले आणि लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या सवलतीनंतर जून महिन्यात देशाच्या बहुतांश राज्यांच्या प्रमुख बाजारांत व्यवसाय गेल्या वर्षीच्या समान अवधीच्या तुलनेत जवळपास निम्मा राहिला आहे. महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश आणि बिहारच्या प्रमुख बाजारपेठांत व्यवसाय २० टक्के ते ८० टक्क्यांपर्यंत घसरण पाहायला मिळाली. दुसरीकडे, यादरम्यान गुजरातच्या प्रमुख बाजारांत व्यवसाय गेल्या वर्षी जूनच्या तुलनेत दुपटीपर्यंत वाढला आहे.

राजस्थानच्या सर्व २४७ कृषी उत्पन्न बाजारांत जून महिन्यातील व्यवसायात ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत घसरण नोंदली.

जयपूर व्यापार महासंघाचे अध्यक्ष सुभाष गोयल यांच्यानुसार, राजस्थानमध्ये हरभरा, मटार, मोहरी, बाजरी, गहू, जव, तीळ, धने, जिरे आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होते. या पार्श्वभूमीवर राज्यातील बाजार समित्यांत दररोज १,५०० ते १,६०० काटी रुपयांचा व्यवसाय होणे सामान्य बाब होती. मात्र, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केलेले लॉकडाऊन आणि लोकांच्या मनातील भीतीमुळे कृषी उत्पन्न बाजारांतील व्यवसायात ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत घट आली आहे. महाराष्ट्रातील बाजार समित्यंातील व्यवसाय राजस्थानपेक्षाही कमी झाला आहे.

औरंगाबाद बाजार समितीत या जूनमध्ये केवळ दीड कोटी रुपयांचा व्यवसाय झाला. हा गेल्या वर्षीच्या तुलनेत ८८.३७ टक्के कमी आहे. याच पद्धतीने बारामती कृषी उत्पन्न बाजारात सुमारे ५५ टक्के आणि मुंबई-वाशी बाजार समितीत ५१ टक्के घसरण नाेंदली आहे. बिहारच्या पाटणा बाजार समितीतही जूनमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ४६.८७% घसरण पाहायला मिळाली. मध्य प्रदेशात इंदूरमधील बाजार समितीत अपेक्षेनुसार कमी घसरण(२२%) राहिली.

गुजरातमध्ये दुप्पट आवक दिसली

राजकोट एपीएमसीचे सचिव बी.आर. तेजाणी यांच्यानुसार, रब्बी हंगामात गहू, हरभरा आणि कोथिंबीर-मिरचीसारख्या मसाल्याच्या उत्पन्नाची सर्वाधिक आवक होते. एप्रिलपासून रब्बी हंगामातील उत्पन्न बाजारात येऊ लागले आहे. मात्र, या वर्षी लॉकडाऊनमुळे शेतकरी एप्रिलमध्ये उत्पन्न बाजार समित्यांत नेऊ शकले नाहीत. याची आवक जूनमध्ये सर्वात जास्त राहिली. अद्यापही ३०% शेतकऱ्यांनी उत्पन्न विकले नाही. हे या महिन्यात येण्याची अपेक्षा आहे.

यामुळे घटला व्यवसाय

> लग्नांमध्ये ५० लोकांनाच सहभागी होण्याची परवानगी

> हॉटेल, रेस्तराँ आणि ढाबे पूर्णपणे उघडले नाहीत

> केंद्र सरकारकडून ८० कोटी लोकांना मोफत शिधा

Advertisement
0