आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉलमार्किंग:सोन्याच्या दागिन्यांवर आगामी 1 जूनपासून हॉलमार्किंग सक्ती, ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्डची ज्वेलर्सना अधिसूचना

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सोन्याच्या दागिन्यांवर अनिवार्य हॉलमार्किंग एक जूनपासून लागू होणार आहे. ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्डने (बीआयएस) ज्वेलर्सना अधिसूचना पाठवून याची माहिती दिली आहे. काही ज्वेलर्स अनिवार्य हॉलमार्किंगला आणखी ९ महिने लांबणीवर टाकण्याची मागणी करत होते.

अधिसूचननेनुसार, सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता आता तीन ग्रेडमध्ये मोजली जाईल. यात २२ कॅरेट, १८ कॅरेट आणि १४ कॅरेटच्या दागिन्यांचा समावेश असेल. विशेष म्हणजे, बीआयएस आधी १५ जानेवारीपासन हॉलमार्किंग बंधनकारक करण्याची घोषणा केली होती. ज्वेलर्सच्या मागणीनंतर ही मुदत वाढवून १ जून करण्यात आली होती. आता गुरुवारच्या अधिसूचननेनुसार देशभरात १ जूनपासून सक्तीचे हॉलमार्किंग लागू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...