आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेलिकॉम मार्केट:भारतात हँडसेट, हेडफोन, विअरेबल्स मार्केट 36% वाढले; जगात घटले

नवी दिल्ली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या वर्षी देशाचे ऑफलाइन टेलिकॉम मार्केट व्हॅल्यूच्या हिशेबाने ३६% वाढले. म्हणजे २०२२ मध्ये स्टोअर आणि दुकानांद्वारे जेवढे स्मार्टफोन, विअरेबल्स आणि टीडब्ल्यूएस मोबाइल हेडसेट्स विकले गेले, त्यांची किंमत २०२१ मध्ये विकल्या गेलेल्या उत्पादनांच्या तुलनेत ३६% जास्त आहे. विशेष म्हणजे मार्केट इंटेलिजन्स फर्म जीएफकेच्या आकड्यांनुसार, गेल्या वर्षी जागतिक टेलिकॉम मार्केटमध्ये ९.७% घट नोंदवण्यात आली.

गुरुवारी जाहीर जीएफकेच्या अहवालात अंदाज वर्तवण्यात आला आहे की, यंदा टेलिकॉम मार्केट जवळपास स्थिर राहील. मात्र काही मूल्याधारित वाढ दिसू शकते. या अहवालात म्हटले आहे की, जगभरातील बाजारांच्या विपरीत भारतीय टेलिकॉम मार्केटने जोरदार कामगिरी केली आहे. २०२२ मध्ये भारतीय टेलिकॉम मार्केटच्या (स्मार्टफोन, विअरेबल्स आणि टीडब्ल्यूएस मोबाइल हेडसेट्स) कंपन्यांचे उत्पन्न १०% पेक्षा जास्त वाढले आहे.

बातम्या आणखी आहेत...