आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची संख्या 100 दशलक्ष पेक्षा जास्त झाली आहे. यात सर्वाधिक गुंतवणूकदार महाराष्ट्रातील आहेत. त्याच बरोबर मध्य प्रदेश, आसाम आणि मणिपूरमधील गुंतवणूकदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. एका वर्षात एक कोटी गुंतवणूकदार जोडले गेले आहेत. मुंबई शेअर बाजारातील (BSE) नोंदणीकृत गुंतवणूकदारांची संख्या 10 कोटींच्या पुढे गेली आहे. 91 दिवसात एक कोटी नवीन गुंतवणूकदार वाढले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार वाढण्याची ही पहिलीच वेळ आहे. यासह मार्केट कॅप 254 लाख कोटी रुपयांवर गेला आहे.
15 डिसेंबर रोजी गुंतवणूकदारांची संख्या 9 कोटी
मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, 15 डिसेंबर रोजी बीएसईच्या एकूण नोंदणीकृत गुंतवणूकदारांची संख्या 9 कोटी होती. 16 मार्च रोजी 10 कोटींची संख्या पार झाली. त्याआधी 85 दिवसांत एक कोटी गुंतवणूकदार वाढले होते, ही संख्या 8 ते 9 कोटी झाली. गेल्या दोन वर्षांत गुंतवणूकदारांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे.
मार्केट कॅप 274 लाख कोटी रुपयांवर
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 274 लाख कोटी रुपयांवर पोहोचले होते. बीएसईने 2008 मध्ये प्रथमच एक कोटी गुंतवणूकदारांचा टप्पा ओलांडला होता. बीएसईचे एमडी आशिष चौहान यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली.
14 वर्षांत गुंतवणूकदारांच्या संख्येत 10 पट वाढ
आकडेवारीनुसार, 14 वर्षांत बीएसईच्या गुंतवणूकदारांची संख्या 10 पट वाढली आहे. त्यांची संख्या 2008 मधे एक कोटीवरून 2022 मध्ये 10.08 कोटी झाली आहे. मणिपूर, मध्य प्रदेश, लक्षद्वीप, ओरिसा, आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये गुंतवणूकदारांची संख्या सर्वाधिक वाढली आहे. येथे 100 ते 300% वाढ दिसून आली.
आसाममध्ये 286% वाढ, सर्वाधिक महाराष्ट्रात
आसाममधील गुंतवणूकदारांच्या संख्येत 286% वाढ झाली आहे, तर संपूर्ण देशात ही संख्या वार्षिक आधारावर 58% वाढली आहे. सर्वाधिक गुंतवणूकदार महाराष्ट्रात आहेत, ज्यांची संख्या 2.06 कोटी आहे, ही एकूण गुंतवणूकदारांच्या सुमारे 21% आहे. गुजरात 1.01 कोटींसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरातचा वाटा 11% आहे.
मध्य प्रदेशात 46 लाख गुंतवणूकदार
मध्य प्रदेशात एकूण 46 लाख गुंतवणूकदार आहेत. पंजाबमध्ये 22 लाख, हरियाणामध्ये 31.9, राजस्थानमध्ये 56.30, उत्तर प्रदेशमध्ये 85.43, दिल्लीत 48.66, छत्तीसगडमध्ये 9.1 लाख, बिहारमध्ये 30.61 लाख आणि झारखंडमध्ये 15.41 लाख गुंतवणूकदार आहेत. फेब्रुवारीच्या तुलनेत एकूण गुंतवणूकदार 31.82 लाखांनी वाढले, तर सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत डिसेंबर तिमाहीत 98.8 लाख गुंतवणूकदारांची वाढ झाली.
मध्य प्रदेशात 109% संख्या
मध्य प्रदेशातील गुंतवणूकदारांची संख्या एका वर्षात 109% वाढली, तर छत्तीसगडमध्ये 77% आणि बिहारमध्ये 116% ने वाढ झाली. राजस्थानमध्ये 84.8% आणि उत्तर प्रदेशात 84% गुंतवणूकदार वाढले. नवीन गुंतवणूकदारांसह डीमॅट खाते देखील वेगाने वाढले आहेत. गेल्या तीन वर्षांत त्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. एकूण सुमारे 5 हजार कंपन्या बीएसईमध्ये सूचीबद्ध आहेत.
मात्र, गेल्या वर्षी सूचिबद्ध झालेल्या नव्या कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. त्यांचे मार्केट कॅप 68% पर्यंत घसरले आहेत. यात पॉलिसीबाजार, पे-टीएम या सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. आकडेवारीनुसार, CDSL ही पहिली डिपॉझिटरी आहे जिकडे 60 दशलक्ष डिमॅट खाती आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.