आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • HCL's Shiv Nadar Resigned As Chairman At The Age Of 75; Daughter Roshni Nadar Malhotra Will Be The Chairman Of The Company

निवृत्ती:रतन टाटांच्या मार्गावर शिव नाडर, 75 व्या वर्षात चेअरमनपद सोडले; मुलगी रोशनी नाडर मल्होत्रा कंपनीचे चेअरमनपद सांभाळणार

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नोकरी सोडून 1.87 लाख रुपयांनी सुरू केली होती एचसीएल

देशातील प्रमुख तंत्रज्ञान कंपनी एचसीएलचे संस्थापक आणि चेअरमन शिव नाडर यांनी रतन टाटा यांचा मार्ग अवलंबत ७५ व्या वयात अापल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नाडर यांची मुलगी रोशनी नाडर मल्होत्रा कंपनीचे चेअरमनपद सांभाळतील. कंपनीने शुक्रवारी नियामकीय फायलिंगमध्ये ही माहिती दिली. त्यानुसार, संचालक मंडळाने रोशनींना बोर्ड आणि कंपनीच्या चेअरमनपदी नियुक्त केले आहे. रोशनी आता कंपनीमध्ये नॉन-एक्झिक्युटिव्ह संचालकपदी होत्या. शिव नाडर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक(एमडी) आणि मुख्य रणनीतीक अधिकारी कायम राहतील. भारतातील सॉफ्टवेअर गुरूंपैकी एक म्हणून ओळख असणाऱ्या शिव नाडर यांच्या यशाची कहाणीत बरेच चढ-उतार आहेत. सध्या एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त नेटवर्थच्या नाडर यांनी १९७६ मध्ये केवळ १.८७ लाख रु. भांडवल आणि ६ मित्रांसोबत एचसीएल कंपनीची स्थापना केली हाेती. सुरुवातीस कंपनी हार्डवेअरच्या व्यवसायात होती. ३वर्षांत कंपनीचा व्यवसाय ३ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला.

पहिल्या तिमाहीत ३१.७% वाढला कंपनीचा नफा

नियामकीय फायलिंगनुसार, चालू वित्त वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीला २९२५ कोटी रुपयांचा नफा झाला. वर्षभरापूर्वी समान अवधीत २२२० कोटी रुपयांच्या तुलनेत हा ३१.७ टक्के जास्त आहे. या वर्षी एचसीएलचा महसूल ८.६% वाढून १७,८४१ कोटी रु. राहिला. वर्षभरापूर्वी समान अवधीत कंपनीचा महसूल १६,४२५ कोटी रु. होता. मात्र, हा मार्च तिमाहीच्या १८,५९० कोटींच्या तुलनेत ४ टक्के कमी आहे.

३८ वर्षीय रोशनी देशातील सर्वात श्रीमंत महिला

एचसीएलच्या नव्या चेअरमन रोशनी नाडर देशातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. ३८ वर्षीय रोशनी यांच्या नाव फोर्ब्ज‌च्या “द वर्ल्ड्‌स १०० मोस्ट पाॅवरफुल वुमन-२०१९’ मध्ये समाविष्ट आहे. रोशनी सुरुवातीपासूनच एचसीएलचे सर्व धोरणात्मक निर्णय घेत आल्या आहेत. त्या २८ व्या वर्षी आयटी कंपनी एचसीएलच्या सीईओ झाल्या होत्या.