आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांना आरोग्य विमा आणि टर्म इन्शुरन्स जारी करण्यासाठी विमा कंपन्या प्रतीक्षा करायला लावत आहेत. वेगवेगळ्या कंपन्यांनी अशा लोकांसाठी तीन ते सहा महिन्यांपर्यंतचा कूलिंग ऑफ पीरियड निश्चित केला आहे. म्हणजे कोरोनातून बरे झाल्यानंतर तीन ते सहा महिन्यांनीच पॉलिसी दिली जात आहे.एका मोठ्या जनरल इन्शुरन्स कंपनीने आपल्या एजंटांना जारी केलेल्या नोटमध्ये म्हटले आहे की, ‘कोरोनाच्या प्रकरणात विविध कारणांमुळे कूलिंग ऑफ पीरियड लागू केला जात आहे. कोरोनाबाबत आमची माहिती पुरेशी नाही. त्याच्या जटिलतांचा कुठलाही स्थापित पॅटर्न नाही.
जर आम्ही कूलिंग ऑफ पीरियड ठेवला नाही आणि व्यक्तीत एक किंवा दोन महिन्यांनंतर फुप्फुसांशी संबंधित समस्या विकसित झाली तर ती कोरोनाशी संबंधित आहे की नाही हे निश्चित करणे आमच्यासाठी कठीण होईल. त्यामुळे ग्राहकांसाठी तीन महिन्यांचा योग्य कूलिंग ऑफ पीरियड ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.’ दुसरीकडे, एका जीवन विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानेही ‘दिव्य मराठी’शी केलेल्या चर्चेत,‘आमची कंपनी कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना टर्म इन्शुरन्स जारी करण्यासाठी कूलिंग ऑफ पीरियडचा अवलंब करत आहे,’ हे मान्य केले. कोरोनाच्या वाढत्या क्लेममुळे विमा कंपन्यांची आर्थिक स्थिती खराब होत आहे. कंपन्यांना आपल्या अंदाजापेक्षा अनेक पट जास्त क्लेम द्यावे लागत आहेत. त्यामुळे जोखीम घेण्याची या कंपन्यांची इच्छा नाही.
दीर्घकालीन प्रभावांबाबत काहीही सांगणे कठीणच
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या दीर्घकालीन प्रभावांबाबत काहीही सांगणे कठीणच आहे. त्यामुळे बहुतांश कंपन्या पॉलिसी जारी करण्यासाठी तीन ते सहा महिन्यांचा कूलिंग ऑफ पीरियड टाकत आहेत. त्याचा अर्थ असा की, बरे झाल्यावर तीन ते सहा महिन्यांनंतरच कोणीही पॉलिसी खरेदी करू शकतो. - अमित छाबडा, प्रमुख, हेल्थ इन्शुरन्स, पॉलिसीबाजार डॉट कॉम
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.