आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Health Insurance For Coronavirus; Which Medical Insurance Is Best For You? All You Need To Know News And Live Updates

आरोग्य विमा:कोरोनाकाळात पुरेशी नाही तुमची ग्रुप विमा योजना, म्हणून 'सुपर टॉप-अप' व्दारे अद्यायावत करु शकता

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जर नोकरी जाण्याची भीती असेल तर नवीन पॉलिसी घ्या

कोरोनाकाळात बर्‍याच लोकांना आपल्या कंपन्यांकडून मिळालेली 'ग्रुप आरोग्य विमा योजना' पुरेशी ठरत नसल्याचे वाटत आहे. त्यामुळे बरेच लोक आता आपली विमा योजना अद्यायावत करत असून काही लोक नवीन पॉलिसी घेण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे तुमच्याजवळ कोणकोणते पर्याय आहे, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला योग्य पर्याय निवडता येणार आहे.

ग्रुप​​​​​​​ विमा पॉलिसी म्हणजे काय?
ग्रुप विमा पॉलिसी एक अशी विमा आहे. ज्यामध्ये कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना आणि त्यांच्या कुटुंबांना ही विमा प्रदान करते. कंपनी किंवा फर्म आपल्या कर्मचार्‍यांना आणि त्यांच्या कुटुंबांना आरोग विमा सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रुप विमा पॉलिसी देते. ज्यामुळे कर्मचार्‍यांना आर्थिक सुरक्षेची हमी मिळते.

ग्रुप​​​​​​​ आरोग्य विमा योजनेला अद्यायावत करु शकता
जर तुम्ही ग्रुप आरोग्य विमा (कॉर्पोरेट प्लान) घेतला असेल तर आपल्या कंपनीसोबत बातचित करुन त्याला अद्यायावत करता येईल. कारण हे तुमच्यासाठी फायदेशीर असून यामध्ये कोणताही 'वेटिंग पीरियड' नसतो. विशेष म्हणजे हे केल्यावर आपल्याला कव्हरच्या रक्कमेत वाढ करता येणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन विमा घ्यायचा विचार करत असाल तर यावर एकदा नक्की विचार करा.

'सुपर टॉप-अप'देखील चांगला पर्याय
पर्सनल फायनान्स एक्सपर्ट आणि ऑप्टिमा मनी मॅनेजर्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज मठपाल यांचे म्हणणे आहे की, जर तुमच्या विमा कव्हरची रक्कम पुरेशी नसेल तर तुम्ही त्याला 'सुपर टॉप-अप'द्वारे अद्यायावत करु शकता. तज्ञांच्या मते 'सुपर टॉप-अप' कव्हर घेणे चांगले असून यामध्ये आपल्याला कमी खर्चात जास्त कव्हर मिळते. ज्या व्यक्तींकडे आधीच कोणतीतरी आरोग्य विमा आहे त्यांनाच 'सुपर टॉप-अप'चा लाभ घेता येऊ शकतो.

जर नोकरी जाण्याची भीती असेल तर नवीन पॉलिसी घ्या
कोरोनामुळे देशात अनेक लोकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. जर तुम्हीही यामुळे चिंतेत असाल तर तुमच्यासाठी नवीन पॉलिसी घेणे फायद्याचे ठरणार आहे. कारण तुम्हाला कंपनीकडून मिळालेली विमा नोकरी गेल्यावर कामात येत नाही. अशावेळी 'सुपर टॉप-अप' पर्यायदेखील योग्य राहत नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या गरजेनुसार एक आरोग्य विमा कव्हर घ्यायला हवा.

बातम्या आणखी आहेत...