आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्थकेअर क्षेत्र:या वर्षात हेल्थकेअर कंपन्यांनी आयपीओतून उभारला विक्रमी 12,000 कोटींचा निधी

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महामारीनंतर वेलनेस उत्पादने आणि सेवांची मागणी वाढल्याचा परिणाम

निदान सेवांपासून ते वेलनेस, रुग्णालय साखळी, बल्क ड्रग्ज उत्पादक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांना प्राथमिक समभाग विक्रीतून भांडवल बाजारात निधी उभारण्याला यश मिळत आहे. या वर्षी आतापर्यंत झालेल्या ४१ प्राथमिक समभाग विक्रीमध्ये हेल्थकेअर कंपन्यांचा वाटा २२ टक्के आहे. प्राथमिक समभाग विक्रीद्वारे भांडवल बाजारातून या कंपन्यांनी १२ हजार काेटी रुपयांपेक्षा जास्त निधी उभारला आहे. त्याचबराेबर आणखीही काही कंपन्या भांडवल बाजाराचा उंबरठा आेलांडण्याच्या तयारीत आहेत. गेल्या एका दशकात जेवढा निधी उभारला नाही तेवढा निधी हेल्थकेअर कंपन्यांनी २०२१ वर्षात उभारला आहे.

काेराेेना महामारीनंतर लाेक निराेगी आणि तंदुरुस्त जीवन शैलीवर लक्ष देत आहेत. त्यामुळे वेलनेस उत्पादने आणि सेवांची मागणी वाढली आहे. त्याचबराेबर चीनवरील परावलंबित्व कमी करण्याची जाणीवही महामारीने करून दिली आहे. कंपन्यांनी चीन प्लस धाेरण अवलंबले आहे. त्यामुळे बल्क ड्रग उत्पादकांना तयार आैषध उत्पादकांकडून नवीन आॅर्डर मिळू लागल्या आहेत. व्यवसाय विस्तारासाठी त्यांना निधी उभारण्याची गरज आहे. शेअर बाजारातील विक्रमी तेजीमुळे गुंतवणूकदारांमध्ये माेठ्या प्रमाणावर उत्साह आहे. त्याच दरम्यान कंपन्या आपला विस्तार, कर्ज परतफेड व अन्य कंपनी गरजांसाठी आयपीआेच्या माध्यमातून निधी उभारत आहेत.

या वर्षातील ९ हेल्थकेअर कंपन्यांच्या आयपीआेवर नजर टाकली असता यातील चार कंपन्यांनी विस्तार किंवा उपकरणे खरेदी करण्यासाठी निधी उभारला आहे. तर सहा कंपन्यांनी आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी निधी उभारला आहे.

या वर्षी आतापर्यंत आलेल्या एकूण ४१ आयपीआेबद्दल सांगायचे तर कंपन्यांनी याद्वारे सुमारे ६५,०००कोटी रुपये उभारले आहेत. आणखी काही कंपन्याही आयपीआे आणणार आहेत.

या कंपन्याही आहेत रांगेत
- वेलनेस फोरएव्हर मेडिकेअर
- ग्लोबल हेल्थ (मेदांता हॉस्पिटल्स)
- सहजानंद मेडिकल टेक्नोलॉजीज
- विदा क्लिनिकल रिसर्च
- हेल्थियर्न मेडटेक
- मेडप्लस हेल्थ सर्व्हिसेस
- इनफिनियन बायोफार्मा
- एमक्युअर फार्मास्युटिकल्स
- व्हीएलसी हेल्थकेअर
- सुप्रिया लाइफ सायन्सेस

केमप्लास्ट सनमारने दाेन महिन्यांत ४८.४% परतावा
केमप्लास्ट सनमार या कृषी आणि आैषध रसायन उत्पादक कंपनीने आॅगस्टमध्ये प्राथमिक समभाग विक्रीतून ३,८५० काेटी रुपये गाेळा केले हाेते. दाेन महिन्यांत या समभागाने गुंतवणूकदारांना ४८.४ % पर्यंत परतावा दिला आहे.

न्यूरेकाने आठ महिन्यांत दिला ३७५% परतावा
डिजिटल उपकरणांचे उत्पादन करणाऱ्या न्यूरेका लिमिटेडने फेब्रुवारीमध्ये प्राथमिक समभाग विक्रीतून केवळ १०० काेटी रुपये उभारले हाेते. आठ महिन्यांत या समभागांनी आपल्या गुंतवणूकदारांना ३७५% पर्यंत परतावा दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...