आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहार्ट फेल्युअरच्या उपचारांवरील औषधे जानेवारीनंतर ५०-७०% घटू शकतात. स्विस कंपनी नोवार्टिसच्या वायमाडा वा अँट्रेस्टो औषधाच्या पेटंटची मुदत जानेवारीत संपत आहे. यानंतर ५ मोठ्या औषध कंपन्या त्याची जेनेरिक अावृत्ती लाँच करण्याच्या तयारीत आहेत. यात टोरेंट फार्मा, सन फार्मा, सिप्ला, ल्यूपिन, यूएसव्ही यांचा समावेश आहे. सध्या १०० एमजीच्या वायमाडाच्या एका गोळीची किंमत ८५ रुपये आहे. तज्ज्ञांनुसार, जेनरिक आवृत्ती बाजारात आल्यानंतर तिची किंमत ५०-७०% स्वस्त होऊन २५.५-४२.५ रुपयांपर्यंत येईल. इतर कंपन्यांनाही अशी औषधे स्वस्त करावी लागतील. देशातील कार्डियाक बाजारपेठ २३,००० कोटींची आहे. यात वायमाडाचा मोठा वाटा (५५० कोटी) आहे. त्याची जागतिक बाजारपेठ २३,५२३ कोटींची आहे. डॉ. रेड्डीज लॅबने यंदा एप्रिलमध्ये ४६३ कोटींत नोवार्टिसकडून सिडमस हा कार्डियोव्हॅस्क्युलर ब्रँड खरेदी केला होता.
हृदयाची धडधड घटवण्यासाठी वायमाडाचा वापर हार्ट फेल्युअरवरची गोळी वायमाडा सॅक्युबिट्रिल व वॅल्सेट्रानचे कॉम्बिनेशन आहे. सॅक्युबिट्रिल रक्ताभिसरणाला नियंत्रित करते. वॅल्सेट्रान कॉमन अँटी-हायपरटेन्सिव्ह आहे. तिच्या प्रभावामुळे हृदयाची धडधड कमी होते, रक्तदाब नियंत्रित राहतो.या दोन्ही औषधांचा संयुक्त प्रभाव कमकुवत झालेल्या हृदयावरील तणाव कमी करतो.
कार्डियाक औषध बाजारपेठेतील वाटा औषध वाटा अँटिहायपरटेन्सिव्हज 53% लिपिड लोअरिंग 23% प्लेटलेट अॅग्रेगेशन इनहॅबिटर्स 5% डाययुरेटिक्स 4% बाजारात सन फार्माचा सर्वाधिक वाटा आहे. देशातील २० फार्मा कंपन्यांची कार्डियाक बाजारपेठेत ५६% हिस्सेदारी आहे. (स्रोत: मार्केट रिसर्च फर्म अॅवाक्स)
पेटंटची मुदत संपणाऱ्या औषधांच्या मूल्यनिर्धारण पद्धतीवर काम पेटंटची मुदत संपणाऱ्या प्रमुख औषधांवर देशातील मूल्य नियामक नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अॅथॉरिटी (एनपीपीए) नजर ठेवत असते. पेटंटची मुदत संपणाऱ्या औषधांच्या मूल्यनिर्धारण पद्धतीवर केंद्र आणि उद्योगजगत काम करत आहेत. सूत्रांनुसार, मधुमेहाच्या काही प्रमुख औषधांच्या पेटंटची मुदत नुकतीच संपल्याने हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे आहे. अद्याप अंतिम शिक्कामोर्तब हाेणे बाकी आहे. मात्र मूल्यनिर्धारण पद्धत पेटंट संपणाऱ्या औषधांचे कमाल मूल्य इनोव्हेटर किमतीच्या ५०% पर्यंत निर्धारित करू शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.