आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहीरो मोटोकॉर्पने स्प्लेंडर एक्सटेक ही नवीन मोटारसायकल लाँच केली आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशातील सर्व अधिकृत विक्रेत्यांकडे लाँच करण्यात आली. याप्रसंगी संजय सिंग (विभागीय व्यवस्थापक), लश्मिशा (विभागीय विक्री प्रमुख), गौरव शर्मा ( विभागीय प्रमुख राजस्थान) आणि मनीष करवा ( विभागीय विक्री व्यवस्थापक, राजस्थान) उपस्थित होते. नवीन हीरो स्प्लेंडर एक्सटेक ही प्रगतिशील आणि नावीन्यपूर्ण डिझाइनची मोटारसायकल आहे.
कंपनी ग्राहकांना ही बाइक दररोज प्रॅक्टिकल पद्धतीने वापरण्याची ऑफर देत आहे. नवीन नवीन हीरो स्प्लेंडर एक्सटेक ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटीसह संपूर्ण डिजिटल मीटर, कॉल आणि एसएमएस अलर्ट, अारटीएमअाय(रिअल टाइम मायलेज इंडिकेटर), लो फ्युएल इंडिकेटर, एलईडी हाय इंटेन्सिटी पोझिशन लॅम्प (एचअायपीएल) आणि अनेक अतुलनीय वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. ग्राफिक्स समाविष्ट आहेत. याशिवाय, हे इंटिग्रेटेड यूएसबी चार्जरसह येते. साइड-स्टँड इंजिन कट ऑफ आणि हीरोचे क्रांतिकारी अाय ३ एस तंत्रज्ञान (आयडल स्टॉप स्टार्ट सिस्टिम) सारखी वैशिष्ट्ये यात अाहेत. हीरो स्प्लेंडर एक्सटेक हीरो मोटाेकॉर्प डीलरशिपवर ७२,९०० रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत असेल. स्प्लेंडर एक्सटेकला ५ वर्षांची वाॅरंटी अाहे. ही मोटारसायकल स्पार्क्लिंग बीटा ब्ल्यू, कॅन्व्हास ब्लॅक, टोर्नाडो ग्रे आणि पर्ल व्हाइट अशा चार नवीन रंगांमध्ये आहे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.