आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Higher Taxes On Petrol diesel; Government companies Profit To Rs 25,000 Crore In 3 Months

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तेल कंपन्या:पेट्रोल-डिझेलवर जास्त कर; सरकार-कंपन्यांनी 3 महिन्यांत 25 हजार कोटींवर उकळले

नवी दिल्ली / स्कंद विवेक धर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कच्चे तेल स्वस्त होऊनही 10 रुपये प्रतिलिटरपेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहेत

कोरोनाकाळात लोक आर्थिक संकटात असताना सरकार व तेल कंपन्या कच्च्या तेलातील दरकपातीचा फायदा ग्राहकांना देण्याऐवजी आपलेच खिसे भरत होत्या. सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत तेल कंपन्यांचा निव्वळ नफा तीन पटींनी वाढून १०,९५१ कोटींवर गेला. सरकारलाही करापाेटी १८,७४१ कोटींचा अतिरिक्त महसूल मिळाला.

पेट्रोलियम उत्पादनांत ८०% खर्च कच्च्या तेलाचा असतो. गतवर्षी जुलै ते सप्टेंबर तिमाहीत भारतीय बास्केटच्या कच्च्या तेलाचा दर ४,१०० ते ४,४०० रुपयांदरम्यान होता. तो एप्रिल-मेमध्ये २,००० रु. प्रतिबॅरलपर्यंत आला. होता. तेव्हा पेट्रोल-डिझेल स्वस्त करण्याऐवजी सरकारने ६ मेपासून पेट्रोलवर १० व डिझेलवर १३ रुपये. प्रतिलिटर अतिरिक्त उत्पादन शुल्क लादले. ते आजवर कायम आहे. सध्या कच्च्या तेलाचे दर ३,००० रु.च्या दरम्यान आहेत. ते २०१९ च्या तुलनेत १००० रुपये प्रतिबॅरलने कमी आहेत. तरीही लोकांना पेट्रोलसाठी १० रुपयांपेक्षा जास्त पैसे द्यावे लागत आहेत. डिझेलचेही दर ६४ रुपयांवरून ७५ ते ७६ रुपये प्रतिलिटरवर गेले आहेत.

वाढीव करांमुळे सरकारला सप्टेंबर २०२० तिमाहीत अतिरिक्त १८,७४१ कोटी रुपयांचे उत्पादन शुल्क मिळाले. देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन आॅइलचा नफा सप्टेंबर २०१९ तिमाहीतील ५६३.४२ कोटींवरून १० पटींपेक्षा जास्त वाढत ६,२२७ कोटी रुपये झाला आहे. एचपीसीएलचा नफा १,०५२ कोटींवरून २,४७७ कोटी तर बीपीसीएलचा १,७०८ कोटींवरून २२४७ कोटी रुपयांवर गेला आहे. संपूर्ण तिमाही म्हणजे ९२ दिवसांपर्यंत तेल कंपन्यांनी दर स्थिर ठेवले. १३ दिवस दरवाढ झाली. सप्टेंबरअखेरीस फक्त ७ दिवस दरकपात झाली.

एका सरकारी तेल कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, देशातील तेल कंपन्यांनी नफा कमावण्यात काहीही गैर नाही. पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्सचे मुख्य अर्थतज्ज्ञ डॉ. एस.पी. शर्मा म्हणाले, आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रूड आॅइलचे दर स्वस्त झाले असतील तर त्याचा फायदा ग्राहकांना देण्यात आलाच पाहिजे. इंधन दरकपात न केल्यामुळे मालभाडे कायम महाग राहील. परिणामी महागाई वाढेल. जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने आंतरराष्ट्रीय क्रूड ऑइलच्या दरांच्या हिशेबाने किरकोळ विक्रीचेही दर कमी करायला हवेत.

कंपन्या : इंडियन आॅइल, बीपीसीएल, एचपीसीएलचा नफा ३,३२३ कोटींवरून १०,९५१ कोटींवर गेला
सरकार : ५५,७३३ कोटी करवसुली, गतवर्षीच्या समान तिमाहीपेक्षा यंदा १८,७४१ कोटी रु. जास्त

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser