आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Hit By Costly Listings In Expensive Markets; 10 Out Of 11 Listed Stocks Are Trading Below The Listing Price Bussiness News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीओचा परिणाम:महागड्या बाजारात खर्चिक किमतीवरील लिस्टिंगमुळे फटका; सूचिबद्ध ११ पैकी १० शेअर लिस्टिंग प्राइसपेक्षा खाली करताहेत ट्रेडिंग

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उच्च पीई रेशोवर आले होते, आता इश्यू प्राइसपेक्षाही खाली चालताहेत ५ कंपन्यांचे शेअर्स

देशात आयपीओबाबत किरकोळ गुंतवणूकदारांचा उत्साह शिगेला आहे. मात्र, त्यांना आयपीओ गुंतवणुकीत बराच फटका बसला आहे. या वर्षी आतापर्यंत लिस्ट झालेल्या ११ आयपीओपैकी १० शेअर लिस्टिंग प्राइसपेक्षा कमी किमतीवर व्यवसाय करत आहेत. यापैकी पाच असे आहेत, ज्यांची ट्रेडिंग इश्यू प्राइसपेक्षाही खाली होत आहे. वास्तवात बहुतांश आयपीओ उच्च पीई रेशोवर आले होते. शेअर बाजारात सूचिबद्ध झाल्यानंतर याच्या किमती जेव्हा स्थिर होण्यास सुरू झाले तेव्हा त्यांचे भाव पडले. कारण, त्यांची वास्तविक किंमत आधीच कमी होती. या वर्षी आतापर्यंत आलेल्या आयपीओमध्ये अँटोनी वेस्ट हँडलिंग सेल, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पाेरेशन, होम फर्स्ट फायनान्स, ईजी ट्रिप प्लॅनर्स आणि अनुपम रसायनच्या शेअर्सची ट्रेडिंग इश्यू प्राइस खाली येत आहे. रेलटेल कॉर्पाेरेशन वगळता अन्य सर्वांची ट्रेडिंग लिस्टिंग प्राइस कमी किमतीवर होत आहे. विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, सध्या प्राथमिक बाजाराचे जे चित्र पुढे येत आहे, त्याचे सर्वात मोठे कारण आयपीओची अॅग्रेसिव्ह प्रायसिंग आहे.

कंपन्यांनी उचलला संधीचा फायदा
काही आठवड्यांपूर्वी बाजार सर्वकालीन उच्चांकावर होता. कंपन्यांना वाटले की, भांडवल जमा करण्याची चांगली संधी आहे. मात्र, चांगल्या लिस्टिंगनंतरही बहुतांश अायपीओ कमकुवत दिसले. याचे कारण म्हणजे, आयपीओची प्रायसिंग जास्त होती व यादरम्यान बाजारात करेक्शन सुरू झाले. -आतीश मटलावाला, सीनियर अॅनालिस्ट, एसएसजे फायनान्स अँड सिक्युरिटीज

तेजीचा फायदा उचललेल्या कंपन्यांनी उच्च किमतीवर उतरवले शेअर
लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीजचे शेअर गुरुवारी बीएसईमध्ये इश्यू प्राइस १३० रुपयांच्या तुलनेत १२.१५% उसळीसह १५६.२० रुपयांवर लिस्ट झाले. कंपनीचे २६.६२% वाढीसह १६४.६० रुपयावर बंद झाला. दुसरीकडे, क्राफ्टसमॅन ऑटोमेशनचे शेअर आयपीओ प्राइस १४९० रुपयांच्या तुलनेत १,३५० रुपयांसोबत ९.४०%सूटीवर लिस्ट झाले. व्यवसायादरम्यान त्यांनी १४८९.०० ची उच्च पातळी प्राप्त केली. सायंकाळी हा ३.८३% नुकसानीसह १,४३३ रुपयांवर बंद झाला.
लक्ष्मी ऑर्गेनिक २०% प्रीमियम, क्राफ्ट‌्समॅन ९.४% सुटीवर लिस्ट

या कारणांमुळे पडले नवे शेअर
-कंपन्यांनी आयपीओची अॅग्रेसिव्ह किंमत ठेवली
-बाँड यील्ड, कोविड प्रकरण वाढल्याने धारणा बिघडली
- देशातील शेअर बाजारात करेक्शन सुरू झाले

बातम्या आणखी आहेत...