आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Hit Sales; The Sensex Fell By 566 Points, The Second Consecutive Day Of Decline In The Domestic Stock Market On Wednesday| Marathi News

मुंबई:विक्रीचा मारा; सेन्सेक्स 566 अंकांनी घसरला, देशांतर्गत शेअर बाजारात बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशांतर्गत शेअर बाजारात बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. सेन्सेक्स ५६६.०९ घसरून ६० हजारांच्या खाली जात ५९,६१०.४१ अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टीमध्ये १४९.७५ अंकांची घसरण हाेऊन ताे १७,८०० अंकांच्या जवळ जाऊन १७,८०७.६५ अंकांच्या पातळीवर बंद झाला. जागतिक शेअर बाजारातील नरमाईच्या वातावरणामुळे बँका आणि आयटी समभागांच्या नफारूपी विक्रीमुळे बाजार घसरला. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, व्याजदराशी संबंधित समभागांमध्ये घसरण झाली.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे गव्हर्नर एल.ब्रेनार्ड यांच्या वक्तव्यामुळे अमेरिकेची मध्यवर्ती बँक नजीकच्या भविष्यात व्याजदरात आक्रमकपणे वाढ करेल अशी भीती बाजारात निर्माण झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...