आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्न- उत्तर:टाटा मोटर्स होल्ड करा, सप्लाय संकट संपल्यानंतर तेजी शक्य

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझ्याकडे टाटा मोटर्सचे १०० शेअर्स ४०७ रु. भावाने घेतले आहेत. मी ते लाँग टर्मसाठी होल्ड करू की नफा वसूल करू? - अतुल तुम्ही लाँग टर्मच्या दृष्टिकोनातून टाटा मोटर्सचे शेअर होल्ड करू शकता. कारण पुरवठा, सेमीकंडक्टर आणि कमोडिटीबाबतच्या समस्या हळूहळू कमी होत आहेत आणि त्यात रिकव्हरी दिसून येत आहे. जग्वार लँड रोव्हरकडेही सकारात्मक दृष्टिकोन आहे. भारतातील प्रवासी कार आणि व्यावसायिक वाहने या दोन्हीमध्ये टाटाची भागीदारी मजबूत आहे. भविष्य आशादायी दिसतो आहे.

माझ्याकडे टाटा पॉवरचे ८० शेअर्स २६७ रुपये, टीसीएसचे ४४ शेअर्स ३५०० रुपये आणि एलआयसीचे १५ शेअर्स ९४९ रुपयांना आहेत. मी ते होल्ड केले पाहिजे की विकावेे?- हितेश शर्मा

हे तिन्ही शेअर्स दीर्घकालीन दृष्टिकोनातून खूप चांगले आहेत. ते अल्पावधीत चांगली कामगिरी करत नसतील पण त्यांच्या वाढीच्या शक्यता खूप मजबूत आहेत. टीसीएसचा आकार, ऑर्डर बुक, स्पेशलायझेशन आणि क्षमता लक्षात घेता ते सध्याच्या मॅक्रो आर्थिक परिस्थितीशी सामना करण्यास सक्षम आहे.उद्योगाच्या वाढीचा फायदा घेण्यासाठी अव्वल आहे. टाटा पॉवर ही भारतातील सर्वात मोठी सौर ईपीसी कंपनी आहे आणि ती जलदगतीने अक्षय ऊर्जेमध्ये प्रवेश करत आहे. एलआयसीकडे उद्योगाचे अग्रगण्य स्थान राखण्यासाठी सर्व क्षमता आहेत.

अदानी पोर्ट, डी-मार्ट, बजाज फायनान्स, बॅम्बिनो अॅग्रो, एचसीएल, इन्फोसिस, मारुती सुझुकी, प्रॉक्टर अँड गॅम्बल हेल्थ, रिलायन्स आणि झी एन्टरटेनमेंटवर दीर्घ मुदतीसाठी सल्ला द्या- राजेंद्र

डी-मार्ट, बजाज फायनान्स, एचसीएल, इन्फोसिस, मारुती, रिलायन्स हे चांगले शेअर्स आहेत आणि ते दीर्घ मुदतीसाठी ठेवू शकतात. तुम्ही झी देखील धरू शकता; परंतु ते सोनीत कसे विलीन होते हे पाहण्यासाठी सतत निरीक्षण करणे आवश्यक आहे. अदानी पोर्ट, बॅम्बिनो अॅग्रो आणि पी अँड जी हेल्थ बद्दल आमचे कोणतेही मत नाही.

माझ्याकडे एंजेल वन १२२ शेअर्स रु. १३७० भावाने, आदित्य बिर्ला कॅप १२५० शेअर रु. ११३ रू, टीसीएस ३५ शेअर ३८२५ रु.ने आहे. माझे खूप नुकसान झाले. काय करायचं -मनीष मंकड

तुम्ही तिन्ही स्टॉक होल्ड करू शकता. ते नफ्यात येण्यासाठी थोडा उशीर लागू शकतो; परंतु त्या चांगल्या कंपन्या आहेत. मध्यम ते लाँग टर्ममध्ये त्यांची रिकव्हरी होण्याची शक्यता आहे.

माझ्याकडे अल्केम लॅब, एचसीएल टेक, एलआयसी आणि कावेरी सीड्समध्ये शेअर्स आहेत.त्यांचे भविष्य कसे आहे? - नम्रता नजीकच्या भविष्यात अल्केम लॅबचे प्रदर्शन कमजोर राहू शकते. एचसीएलमध्येही सध्या कमजोरी दिसते आहे; परंतु लाँगटर्मचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. एलआयसीची गती थोडी मंद राहू शकते. अलीकडील निकालानंतर आम्ही तुम्हाला कावेरी सीड्समधून बाहेर पडण्याचा सल्ला देऊ.

बातम्या आणखी आहेत...