आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Home auto Loans Expensive After 45 Months, But Good Days For FDs, Steps Taken To Control Inflation

रिझर्व्ह बँकेने रेपो रेट 0.40% वाढवला:45 महिन्यांनंतर गृह-वाहन कर्ज महाग, पण एफडीला चांगले दिवस, महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी उचलले पाऊल

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय रिझर्व्ह बँकेने बुधवारी रेपो दर ०.४०% वाढवून ४.४०% केला. नवा दर तत्काळ प्रभावाने लागू झाला आहे. त्यामुळे गृह, वाहन कर्जासह इतर कर्ज महागतील. ईएमआयमध्ये वाढ होईल. कंपन्यांना महाग दराने कर्ज मिळेल. तथापि, एफडीसह सर्व जमा रकमेवर जास्त व्याजही मिळेल. वाढती महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्रीय बँकेने हे पाऊल उचलले आहे. किरकोळ महागई दर ३ महिन्यांच्या उद्दिष्टाच्या ६ % या कमाल मर्यादेच्या वर आहे. मार्चमध्ये तो ६.९५% होता. रिझर्व्ह बँकेचे उद्दिष्ट यात २% घट-वाढीच्या शक्यतेसह ४% च्या आसपास ठेवण्याचे आहे. रेपो रेटमध्ये १ ऑगस्ट २०१८ नंतर ही पहिली वाढ आहे. प्रथमच पतधोरण समितीने शेड्यूलविना दरे वाढवली आहेत. त्याआधी, रिझर्व्ह बँकेने शेड्यूलविना २२ मे २०२० ला रेपो दर ०.४०% नी घटवून ४% या विक्रमी स्तरावर आणला होता. समितीची पुढील बैठक ६ ते ८ जूनला होणार आहे.

बाजारात १३०७ अंकांची घसरण : व्याज दरातील वाढीमुळे सेन्सेक्स १,३०७ अंकांनी घसरून ५५,६६९ वर आणि निफ्टी ३९१ अंकांनी घसरून १६,६७७ वर बंद झाला. बँक, रिअल इस्टेट, ऑटो क्षेत्राला जास्त फटका बसला.

जगात काय
ऑस्ट्रेलिया-ब्राझीलकडून व्याज दरात वाढ, अमेरिका-युरोप तयार रशिया-युक्रेन युद्धानंतर कच्चे तेल, कच्च्या साहित्याची आवक थांबल्याने महागाई वाढली आहे. ती नियंत्रणात ठेवण्यासाठी जगभरातील बँका व्याज दर वाढवत आहेत.

मंगळवारी ऑस्ट्रेलियाने दर ०.१% वाढवून ०.३५% केला होता. ही ११ वर्षांतील सर्वात मोठी वाढ आहे. ब्राझीलने व्याज दर २% वरून ११.७५% केला. अमेरिकी फेडरल रिझर्व्हही गुरुवारी दर वाढवू शकते. जानेवारी २०२१ मध्ये अमेरिकेत व्याज दर ०.०८% होता, तो मार्चमध्ये वाढून ०.३३% झाला. युरोपीयन कमिशन बँकेनेही व्याज दर वाढवण्याचे संकेत दिले.

जमा दर वाढणार, व्याजाने उत्पन्नात वाढ होईल
आदिल शेट्‌टी, सीईओ, बँकबाजार.कॉम

गृbसध्या दोन डझनपेक्षा जास्त बँकांचा गृह कर्ज दर ७% पेक्षा कमी आहे. आता
फ्लोटिंग रेंटचे कर्ज महाग होईल. सर्व नवी कर्जे महाग होऊ शकतात. फ्लोटिंग रेटचे कर्ज असेल तर ईएमआय एका अवधीसाठी फिक्स होऊ शकते, पण कर्जाचा अवधी आपोआप वाढेल. त्यावर उपाय म्हणजे तुम्ही कमी व्याज दरावर रिफायनान्स करू शकता, ईएमआय वाढवू शकता आणि नियमितपणे मागील रक्कम भरू शकता.

वैयक्तिक-वाहन कर्ज : त्यांचे व्याज दर निश्चित असते. अशा कर्जासाठी सध्याच्या कर्जदारांना चिंता करण्याची गरज नाही. त्यांचा ईएमआय आणि व्याज दर तोच कायम राहील. नवे कर्ज मात्र महाग होईल हे निश्चित आहे.

बँकेत जमा असलेला पैसा : बँका जमा रक्कम, लहान बचत आणि कॉर्पोरेट ठेवींसाठीचा व्याज दर वाढवू शकते. पीपीएफसारख्या योजनेत लवकरच जास्त रिर्टनची घोषणा होऊ शकेल अशी अपेक्षा आहे. लाँग टर्म बाँड यील्ड वाढत आहे, त्यामुळे म्युच्युअल फंड एनएव्हीत घसरण झाल्याचे दिसेल. व्याजामुळे होणारे उत्पन्न वाढू शकते. तथापि, चलनवाढ जास्त झाल्याने आणि निश्चित उत्पन्नाच्या साधनांद्वारे प्रत्यक्ष रिटर्न (खर्च, कर आणि चलनवाढीनंतरचे रिटर्न) नकारात्मक राहण्याची शक्यता आहे.

सीआरआर वाढल्याचा परिणाम असर : उच्च सीआरआरचा अर्थ असा की, बँकांना आपल्या निधीतील मोठा भाग आरबीआयकडे जमा करावा लागेल. त्यामुळे त्यांच्याकडे उधार देण्यासाठी कमी रक्कम शिल्लक राहील. बाजारात पैसा येण्याची गती कमी राहील. सध्या सीआरआर ४.५० आहे, तो २०१४ च्या नंतर सर्वाधिक आहे.

गृह कर्ज : ५० लाखांवर १,२०९ रु. वाढेल ईएमआय
५० लाख रुपयांचे कर्ज ७% दरावर २० वर्षांसाठी घेतले असेल तर सध्या ईएमआय ३८,७६५ रु. आहे. व्याज दर ७.४% झाल्यास ईएमआय ३९,९७४ रु. होईल. व्याज ४३.०३ लाखांवरून वाढून ४५.९३ लाख रु. होईल.

नवे कार कर्ज : ४ लाखांवर ७६ रु. वाढेल हप्ता
सध्या ७.५% दराने ५ वर्षांसाठी ४ लाख रुपयांचा ईएमआय ८,०१५ रुपये होतो. व्याज दर वाढून ७.९% झाल्यास ईएमआय ८,०९१ रुपये होईल. एकूण व्याज ८०,९११ वरून वाढून ८५,४८६ रुपये होईल.

बातम्या आणखी आहेत...