आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाची बातमी:गृह कर्जाचा अर्ज फेटाळला जाऊ नये यासाठी कर्जाचा अवधी आणि उत्पन्नाचे गुणोत्तर निश्चित करण्यासह या 7 गोष्टी लक्षात ठेवा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वित्तीय संस्थांकडून सिबिल स्कोर चांगला असणा-यांना कर्ज मिळते.

सध्या गृह कर्जाचे व्याज दर 7% पेक्षा कमी आहेत. अशा परिस्थितीत घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याची ही योग्य वेळ असू शकते. परंतु कधीकधी क्रेडिट स्कोर (सिबिल स्कोअर) किंवा अधिक कर्जासाठी अर्ज करणे यासारख्या कारणांमुळे कर्जाचा अर्ज फेटाळला जाऊ शकतो. जर तुम्हीही सध्या होम लोनसाठी अर्ज करणार असाल तर आम्ही तुम्हाला अशा 7 गोष्टींबद्दल सांगत आहोत ज्यामुळे तुमचा अर्ज फेटाळला जाऊ शकतो.

कर्जाचा कालावधी अधिक असणे

बँका आणि एनबीएफसी सहसा 30 वर्षांपर्यंत कर्ज पुरवतात. परंतु जर तुम्ही वृद्ध असाल तर तुम्ही कमी कालावधीसाठी कर्ज घ्यायला हवे. बर्‍याच बँकांच्या नियमानुसार अर्जदाराचे वय 75 वर्षे होण्यापूर्वी कर्जाची परतफेड पूर्ण करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, तुमचे वय 55 वर्षांच्या जवळ असल्यास तुम्ही 20 वर्षांहून अधिक काळासाठी गृह कर्जासाठी अर्ज करू नये.

कमकुवत क्रेडिट स्कोर

बर्‍याच वेळा बँक कमकुवत क्रेडिट स्कोर (सिबिल स्कोअर) किंवा नियमित उत्पन्न नसल्याने गृह कर्ज देण्यास नकार देते. याशिवाय या कारणांमुळे आपल्याला आवश्यक तितके कर्ज मिळू शकत नाही, हेही दिसून येते. अशा परिस्थितीत आम्ही आज तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगत आहोत, ज्याचा अवलंब करुन तुम्हाला सहज कर्ज मिळेल.

अधिक कर्जासाठी अर्ज करू नका
अधिक लोन-टू-व्हॅल्यू (एलटीव्ही) तुम्हाला कर्ज घेण्यास अडचणीचे ठरु शकते. याचा अर्थ असा की घर विकत घेण्यासाठी आपल्याला आपले योगदान जास्त ठेवावे लागेल. समजा आपल्या घराच्या किंमतीचे कमी एलटीव्ही प्रमाण निवडल्यास मालमत्ता खरेदीमध्ये खरेदीदाराचे योगदान वाढते. यामुळे बँकेचा धोका कमी होतो. त्याच वेळी, कमी ईएमआयमुळे कर्जेची क्षमता वाढते. यामुळे आपणास कर्ज मिळण्याची शक्यता वाढेल.

उत्पन्नाचे प्रमाण अधिक असण्याचे निश्चित करा
जेव्हा तुम्ही बँकेत कर्जासाठी अर्ज करता, तेव्हा बँक फिक्स ऑब्लिगेशन टू इनकम रेशिओ (एफओआयआर) देखील पाहते. याद्वारे अर्जदाराच्या कर्जाची परतफेड करण्याच्या क्षमतेचे मुल्यांकन केले जाते. एफओआयआरवरुन कळते की, तुमचे आधीपासून चालू असलेले ईएमआय, घरभाडे, विमा पॉलिसी आणि इतर देयके सध्याच्या उत्पन्नाच्या किती टक्के आहे. जर हे सर्व खर्च तुमच्या पगाराच्या 50% पर्यंत असेल, तर बँक तुमचा कर्जाचा अर्ज नाकारू शकते. म्हणून, हे लक्षात ठेवा की कर्जाची रक्कम यापेक्षा अधिक नसावी.

स्थिर नोकरी नसणे
जर तुम्ही वारंवार नोकरी बदलत असाल तर हे तुमच्या क्रेडिट कार्डसाठी योग्य नाही. वारंवार नोकरीतील बदल हे अस्थिर करिअरचे लक्षण मानले जाते आणि म्हणून अशा व्यक्तींना क्रेडिट कार्ड देणे थोडे धोकादायक मानले जाते. जर अर्जदार कोणत्याही ठिकाणी स्थिर नोकरी करत नसेल तर कर्जाचा अर्ज मंजूर होण्याची शक्यता कमी होते.

पगार कमी असणे
एखाद्या व्यक्तीला क्रेडिट कार्ड देण्यापूर्वी बँका परतफेड करण्याची क्षमता पाहतात. हे जाणून घेण्यासाठी बँका त्या व्यक्तीच्या फॉर्म 16 किंवा सॅलरी स्लिपची मागणी करतात. जर त्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न बँकेने ठरवून दिलेल्या निकषात येत नसेल तर त्या व्यक्तीचा अर्ज नाकारला जातो.

'नो क्रेडिट हिस्ट्री'मुळे येऊ शकते अडचण

ज्याप्रमाणे खराब सिबिल स्कोअरमुळे क्रेडिट कार्डचा अर्ज नाकारला जाऊ शकतो, तशाच प्रकारे नो क्रेडिट हिस्ट्री (म्हणजे कर्ज घेण्याची आणि परतफेड करण्याची कोणतीही नोंद आधीपासूनच नसते) मुळेही अर्ज नाकारला जाऊ शकतो. सर्वसाधारणपणे लोकांना असे वाटते की, आधी कर्ज घेतले नसेल तर क्रेडिट स्कोअर ठीक असेल, परंतु तसे होत नाही. बँका कर्ज घेण्याची आणि परतफेड करण्याच्या क्षमतेच्या आधारे कर्ज देण्याचे देखील ठरवतात. जर आपण आधीच कर्ज घेतलेले नसेल तर ज्या बँकेत तुमचे बचत खाते आहे अशा बँकेत कर्जासाठी अर्ज करा. तुमच्या बचत खात्यातील नोंदी पाहिल्यानंतर बँक कर्ज देऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...