आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपल्या बँकेला विचारा
जर तुमचे कर्ज सुरू असेल तर तुमची बँक वा कर्ज देणाऱ्या संस्थेकडून वाढत्या दराला कसा चाप लावता येऊ शकेल हे जाणून घ्या. अनेक बँकेतर वित्तीय संस्था किरकाेळ प्रक्रिया शुल्क घेऊन तुमचा दर कमी करतात, ज्यामुळे तुमचे व्याज घटते. जर बँकेचे कर्ज असेल आणि तुम्ही एमसीएलआर वा बेस रेट बेंचमार्कवर असाल तर सर्वात कमी दर आताही रेपो कर्जावर आहे हे जाणून घ्या. बँक प्रक्रिया शुल्क घेऊन तुम्हाला रेपो कर्ज देऊ शकते. जर तुम्ही नवीन कर्ज घेत असाल तर आधी प्री- अॅप्रूव्हड आॅफर जरूर बघा जी बँकेने तुमच्यासाठी तयार केली असेल. प्रत्येक बँक आपल्या सर्वात चांगल्या ग्राहकांसाठी आकर्षक लोन आॅफर तयार करतेत्यावर तुम्हाला थाेडी सूट मिळू शकते
डिस्काउंट तपासून घ्या
पुनर्वित्त प्रकरणात अनेक बँका आपल्या सर्वात कमी जाहिरात दरापेक्षाही कमी दरात तुम्हाला कर्ज देऊ शकतात. सवलत मिळवण्यासाठी तुम्हाला पात्र व्हावे लागेल. पुनर्वित्त कंपन्या नेहमी बॅलन्स ट्रान्सफर प्रकरणारत बँका नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दरात सवलत देतात. जर तुम्ही उच्च दराने कर्ज घेतलेले असेल तर पुनर्वित्तच्या माध्यमातून ते कमी करू शकता. उदाहरणार्थ एक खासगी बँक आपला सर्वात किमान दर ७.६०% सांगत असेल तर पुनर्वित्त प्रकरणात ते ७.४५% वर कर्ज देत आहेत. असे अनेक बँकांत हाेते. सूट मिळू शकते का हे आपल्या जवळपासच्या बँकेला विचारा.
महिलांना कर्जाशी जाेडा
कर्ज देणारे अनेक जण आपल्या सर्वात किमान दराने महिलांना कर्ज देतात. महिला याचा फायदा घेऊ शकतात. पुरुषही कुटुंबातील महिलांसह संयुक्त कर्ज घेऊ शकतात. साधारणपणे अशा प्रकारच्य कर्जावर पती-पत्नीसह उधारकर्ता असतात. परंतु आई-मुलगा वा वडील- मुलगी देखील एकत्र कर्ज घेऊ शकतात. यामुळे कर्जफेडीची जबाबदारीही विभागली जातेे व व्याज कमी हाेते.
कर्ज रक्कम कमी करा
गृहकर्जाची रक्कम जितकी कमी असेल तितका व्याजदर कमी असू शकतो. उदाहरणार्थ, खासगी बँक ३० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर सर्वात कमी दर आकारते, ३० ते ७५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर थोडा जास्त दर आणि ७५ लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जावर सर्वाधिक दर आकारते. अधिक कर्ज मिळवून घर खरेदी करणे सोपे होते. परंतु या प्रकरणात हे लक्षात ठेवा की कर्ज मोठे असल्यास व्याज अधिक भरावे लागेल. तुम्ही रिफायनान्स करत असाल तर तुम्हाला छोट्या कर्जावर चांगले व्याजदर मिळू शकतात.
क्रेडिट स्कोअर सुधारा
स्वस्त कर्ज घेण्यासाठी चांगला क्रेडिट स्काेअर असणे गरजेचे आहे. काेणती हिस्ट्री नसेल तर तुमचा स्काेअर नसेल आणि पहिल्यांदा कर्ज घेत असाल तर थाेडे जास्त व्याज द्यावे लागेल. त्यापासून वाचण्यासाठी गृहकर्ज घेण्याच्या आधी क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन या बीएनपीएल घेऊन क्रेडिट स्कोअर विकसित करू शकता. स्काेअर ७५० पेक्षा जास्त वर न्या. तुम्ही कर्ज घेतलेले असेल तर क्रेडिट स्काेअर वाढवा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.